भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पाचोरा येथुन महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते शेगावला जाणार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२२

जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,
वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा ।
जहाँ सत्य अहिंसा और धरम का पग पग लगता डेरा,
वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा ॥


भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन करतांना कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. सचिन सोमवंशी.

अशा या सर्वधर्मसमभाव भारत देशात सद्यस्थितीत सत्तेचा गैरवापर, कायद्याचा खुर्दा करुन चालवली जाणारी फक्त नावालाच उरलेली लोकशाही यामुळे सगळेच त्रास सहन करत आहेत. म्हणून कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी पदयात्रा काढून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो अभियानाची सुरुवात केली आहे. या निमित्ताने दिनांक १८ नोव्हेंबर २०२२ शुक्रवार रोजी श्री. राहुल गांधी यांची पदयात्रा शेगाव येथे पोहचणार असुन या ठिकाणी विराट महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.


भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन करतांना माजी आमदार दिलीप भाऊ वाघ.

शेगाव येथील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी पाचोरा, भडगाव तालुक्यातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. याकरिता पाचोरा तालुक्याचे कॉंगेस अध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी यांनी पाचोरा, भडगाव तालुक्यातील कॉंगेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली होती. या बैठकीत “महाविकास आघाडीच्या” पाचोरा, भडगाव तालुक्यातील कॉंगेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संखेने उपस्थित राहून शेतकरी, शेतमजूर, व्यापारी वर्गाने शेगाव येथील श्री. राहुल गांधी यांच्या महासभेला जाण्याचा एकमुखी निर्णय घेतला व शेगावला जाण्यासाठीचे आयोजन, नियोजन करण्यात आले.


भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन करतांना श्री. अरुण भाऊ पाटील.


भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन करतांना ॲड. अमजद पठाण.

पाचोरा तालूका काॅग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी बोलविलेल्या महाविकास आघाडिच्या बैठकीत राष्टवादी काॅग्रेसचे नेते माजी आमदार श्री. दिलिप वाघ, शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी सह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. विकास पाटील, शहराध्यक्ष अजर खान, श्री. रणजित पाटील, शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी श्री. अरुण पाटील, तालुका प्रमुख श्री. शरद पाटील, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकिरा, शहराध्यक्ष अॅड अमजद पठाण, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, सरचिटणीस श्री. प्रताप पाटील, कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र महाजन, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस सौ. कुसुमताई पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्री. प्रवीण पाटील, श्री. मुकेश तुपे, श्री. गणेश पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष अॅड श्री. अंबादास गिरी, तालुका एस. सी. सेलचे तालुकाध्यक्ष श्री. श्रावण गायकवाड, श्री. अजबराव काटे, श्री. रवींद्र महाजन, श्री. अमरसिंग पाटील, सोशल मीडिया विधानसभा श्री. अध्यक्ष राहुल शिंदे, शहर उपाध्यक्ष श्री. गणेश पाटील, अतुल चौधरी आदी उपस्थित होते.


भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन करतांना श्री. विकास पाटील सर.


भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आवाहन करतांना श्री. प्रविण पाटील.

या बैठकीत श्री. राहुल गांधी यांच्या भारत जोडतो यात्रेनिमित्त शेगाव येथे होणाऱ्या विराट महासभेत पाचोरा शहर आणि ग्रामीण भागातील जनतेने सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सामुहिक आवाहन केले आहे.

टिप~ शेगाव येथील महासभेला जाण्यासाठी पाचोरा येथून मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली असून प्रवासादरम्यान चहा, पाणी, अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी ज्यांना ज्यांना या महासभेत सहाभागी होण्यासाठी यायचे असेल त्यांनी पाचोरा, भडगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी यांच्याशी दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ सोमवार पर्यंत संपर्क करुन आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या