मा. श्री. अमोलभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, श्री. ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज (जळकेकर) यांचे जाहीर किर्तन

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/११/२०२२
पाचोरा तालुक्यातील एक आगळेवेगळे व्यक्तीमत हातात कोणतीही सत्ता नसतांना किंवा कोणत्याही सत्ता, पदाची अपेक्षा न करता गोरगरीब व सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा. श्री. अमोलभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा पाचोरा, भडगाव यांच्यातर्फे जाहीर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. श्री.अमोलभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. ह. भ. प. ज्ञानेश्वरजी महाराज (जळकेकर) यांच्या जाहीर किर्तनाचा कार्यक्रम दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ मंगळवार रोजी सायंकाळी सात वाजता पाचोरा, जामनेर रस्त्यालगत सिंधी कॉलनी येथील दसेरा मैदानावर ठेवण्यात आला आहे. तरी पाचोरा शहरातील तसेच पंचक्रोशीतील नागरीक, माता, भगिनींनी या किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष मा. श्री. मुरलीधर वाणी, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मा. श्री. समाधान बापू मुळे, पाचोरा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस योगेश (भैय्या) ठाकुर व भारतीय जनता युवा मोर्चा पाचोरा, भडगाव व आयोजकांनी केले आहे.