सावखेडा येथील श्री. भैरवनाथ बाबा मंदिर परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०३/२०२३

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथुन जवळच असलेल्या सावखेडा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री. भैरवनाथ बाबा मंदिर परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी काही भाविक, भक्त दर्शनासाठी गेले असता उघडकीस आली आहे.

मृत हरण पाहून सावखेडा येथील काही नागरिकांनी पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना खबर देण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व करत आहेत मात्र वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी फोन स्विकारत नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून वनविभागाने त्वरित येऊन या मृत हरणाची योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी केली आहे.

वनविभागाचे अधिकारी घोड्यावर ~
पाचोरा व जामनेर तालुक्याला मोठमोठ्या राखीव जंगलांची नैसर्गिक देणगी मिळाली आहे. परंतु या राखीव जंगलाच्या देखभालीसाठी नेमलेले वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी इमानेइतबारे काम करत नसल्याने या राखीव जंगलात हरण, रानडुक्कर, ससे व इतर जंगली प्राणी व पक्षांची शिकार तसेच वृक्षतोड करण्यासाठी शिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने धुमाकूळ घातला असून शिकाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी हे जंगली प्राणी गाव वस्तीकडे धाव घेत असल्याने त्यांचा बळी जात असल्याचे जनमानसातून चर्चीले जात आहे.

“वन्य प्राण्यांची शिकार व वृक्षतोड थांबवण्यासाठी वन्यजीव प्रमी व निसर्ग प्रेमी पाचोरा व इतर विभागातील वनविभागाच्या अधिकार व कर्मचाऱ्यांकडे सुचित करण्यासाठी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करतात परंतु संबंधित अधिकारी व कर्मचारी फोन स्विकारत नाहीत व चुकुन एखाद्यावेळेस फोन स्विकारलाच तर बघू, येतो, करतो, लेखी तक्रार दाखल करा अशी कारणे सांगून वेळ मारुन नेत असल्याने वृक्षतोड व शिकाऱ्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.

म्हणून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या बाबींकडे लक्ष न दिल्यास लवकरच आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वन्यजीव प्रमी व निसर्ग प्रेमींनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या