लोहारी येथे एस. टी. बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१०/२०२२

पाचोरा तालुक्यात लोहारी खुर्द व लोहारी बुद्रुक ही दोन गाव जामनेर ते पाचोरा रस्त्यालगत वसलेली असून लोहारी येथुन फक्त सात किलोमीटर अंतरावर पाचोरा हे तालुक्याचे ठिकाण असलेले शहर आहे. तसेच पाचोरा शहरात नामांकित शैक्षणिक संस्था असल्याने लोहारी खुर्द व लोहारी बुद्रुक येथील जवळपास दिडशे मुले, मुली पाचोरा येथे शिक्षण घेण्यासाठी येत, जात असतात याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी एस. टी. चा मासिक पास काढला आहे. परंतु शेंदुर्णी व पिंपळगाव हरेश्र्वर गावाकडून येणाऱ्या एस. टी. बसेस ह्या लोहारी येथील बसस्थानकाजवळ थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता जामनेर, शेंदुर्णी व पिंपळगाव हरेश्र्वर या गावाकडून येणाऱ्या एस.टी. बसेस रिकाम्या असल्यातरी लोहारी बसस्थानकाजवळ थांबत नाहीत. विशेष म्हणजे बस थांब्यावर बस थांबवण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उभे राहून चालकांना हात जोडून इशारे करत बस थांबवण्यासाठी प्रयत्न करतात मात्र वाहक व चालक हे मनमानी पणाने वागुन बस न थांबताच बस पळवून नेतात या त्यांच्या मनमानीपणे वागण्यामुळे विद्यार्थी वेळेवर शाळा, कॉलेजमध्ये जाऊ शकत नसल्याने त्यांंचे शैक्षणिक नुकसान होत आहे.


सबस्क्राईब करा

म्हणून आता सरतेशेवटी विद्यार्थी, विद्यार्थीनींनी व पालकवर्ग लवकरच रस्ता रोको आंदोलन छेडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. म्हणून पाचोरा आगार व्यवस्थापक यांनी वाहक व चालकांना योग्य सुचना देऊन लोहारी बसस्थानकाजवळ बसेस थांबवण्यासाठी सुचना करव्यात अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रेकिंग बातम्या