सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्रावर हम करे सो कायदा, वाहन खाली करण्यासाठी प्रती ट्रॅक्टर हजार ते पंधराशे रुपयांची लुट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२०
शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला चांगला भाव मिळावा,व्यापरीवर्गाकडून शेतकऱ्यांची लुट होऊनये म्हणून शासनाने सी.सी.आय.तर्फे हमीभाव जाहीर करुन प्रतवारी ठरवून दिलेली आहे. व त्यानुसार सी.सी.आय.मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
मात्र या कापूस खरेदी केंद्रावर शेतकरी कापूस विक्रीसाठी नेत असतांनाच त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून पावलोपावली त्याची अडवणूक करून आर्थिक लुट केली जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच असून या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा सक्षम अधिकारी पुढे येत नसल्याने उत्पन्न बाजार समितीच्या पावती मिळवण्यापसून तर टोकन घेतांनाही पैसे मोजावे लागत असल्याचे खात्रीलायक समजते.
तसेच कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडर, हमाल, मापाडी व काही जिनींग मालक यांची मिलीभगत असल्यामुळे कापसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा नंबर लागल्यानंतर ग्रेडर कापसाची प्रतवारी ठरवतात व वजन झाल्यानंतर ते खाली करण्यासाठी हमालांना सांगितले जाते ट्रॅक्टर मधील अर्धा कापूस खाली करतांनाच हमालांचा एक म्होरक्या कापूस विक्रेत्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर खाली करण्यासाठीची मजूरी मागतो शेतकऱ्यांने हमालांना पैसे देण्यासाठी नकार दिल्यास लगेचच ग्रेडरला बोलावून कापूस खराब आहे. असा बनाव करुन प्रतवारी बदलवण्यासाठी व वजनाला कट्टी ( प्रतिक्वींटल कपात करण्यासाठी ) ग्रेडरला सांगितले जाते. या प्रकाराने शेतकरी हतबल होतो व पैसे देण्यासाठी तयार होतो मग हमाल त्या शेतकऱ्याकडून हजार ते पंधराशे रुपये घेतल्याशिवाय ट्रॅक्टर खाली करत नाहीत. (वास्तविक पाहता कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून कोणीही पैसे घेऊनये असे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेले असल्यावरही) हा गैरप्रकार राजरोसपणे सुरू असल्याने जनमाणसातुन संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
या गैरप्रकाराने कापूस खरेदी केंद्रावर कापूस उत्पादक शेतकरी व हमाल, मापाडी, ग्रेडर यांच्यात वाद होतात. या गैरप्रकाराबाबत शेतकरी संबधीताकडे वारंवार तक्रारी करत आहेत. मात्र (तालुक्यातील लोकप्रतिनिधी कींवा तालुकास्तरावर असलेले अधिकारी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांची लुट सुरूच असून आलेया भोगासी असावे सादर असे दिवस शेतकरी काढत आहेत.)
तसेच काही कापूस खरेदी केंद्रावर कापूस व्यापारी व ग्रेडर यांची मिलीभगत असल्याने या शेतकरी कम व्यापाऱ्यांची टोकन मिळण्यापासून तर प्रतवारी व मोजप करतांना सेटिंग असल्याने व्यापाऱ्यांची चलती दिसून येत.