लोहारी ते वाणेगाव रस्त्याचे काम म्हणजे पुढे पाठ मागे सरसपाट, बहुळा नदीवरील पुलाच्या कामाची चौकशी व्हावी, प्रवीण पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील लोहारी ते वाणेगाव रस्त्याचे डांबरीकरण सुरु असून या रस्त्यावर लोहारी खुर्द ते लोहारी बुद्रुक या दोन गावांच्या मधून बहूळा नदी वाहते या नदीवर बऱ्याच वर्षापुर्वी बांधण्यात आलेल्या पुलाचे नुतनीकरण सुरु असून या पुलाचे नुतनीकरण करतांना संबंधित ठेकेदार हे इस्टिमेट नुसार काम करत नसल्याची तक्रार लोहारी येथील प्रवीण पाटील यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील लोहारी ते वाणेगाव पर्यंत पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत डांबरीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यावर डांबरीकरण करतांना गरज भासेल तेथे कॉंक्रिटीकरण करणे बंधनकारक आहे. याच रस्त्यावर लोहारी ते वाणेगाव दरम्यान लोहारी खुर्द ते लोहारी बुद्रुक या दोन गावांच्या दरम्यान बहूळा नदीवर जुना पुल आहे.
या पुलावर सद्यस्थितीत कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु आहे परंतु हे कॉंक्रिटीकरण करतांना संबंधित ठेकेदाराने कॉंक्रिटीकरण करतांना जुन्या कामावर नव्या कॉंक्रिटीकरणाची पकड व्हावी म्हणून ब्रेकर मारणे गरजेचे असतांना तसे काम केले नाही. तसेच स्लॅब टाकतांना त्यात आसारी वापरणे गरजेचे होते परंतु आसारी न वापरताच वहिवाटी रस्त्यावर थेट कॉंक्रिटीकरण केल्यामुळे पुढे काम सुरु असतांनाच मागे कॉंक्रिटीकरणाला तडे पडत असल्याने या रस्ताचे काम म्हणजे पुढे पाठ मागे सरसपाट असे होत असल्याचे मत प्रवीण पाटील व लोहारी ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
तसेच ळहुळा नदीचा उगम मराठवाड्यातील अजिंठ्याच्या डोंगरातून असल्याने या नदीला मोठ्याप्रमाणात पुर येतो एखाद्यावेळेस मोठा पुर आल्यास हे निकृष्ट दर्जाचे कॉंक्रिटीकरण वरच्यावर वाहून जाईल अशी व शासनाच्या लाखो रुपयांची नासाडी होईल म्हणून या लोहारी ते वानेगाव रस्त्याच्या होणाऱ्या व झालेल्या कामांची चौकशी करुन हे काम शासनाने ठरवून दिलेल्या अटी, शर्ती व नियमानुसार करण्यात यावे तोपर्यंत संबंधित ठेकेदाराला व या कामाचा मोबदला देऊ नये अशी मागणी लोहारी येथील प्रवीण पाटील यांनी केली असून ते लवकरच संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.