नोटांचा जोरदार पाऊस पडल्यानंतर पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मते पडली पदरात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०४/२०२३

पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज तिरंगी लढतीत चुरशीचे व विक्रमी मतदान झाले. बाजार समीतीच्या १८ जागांसाठी एकुण ६२ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत ३३४३ मतदारांपैकी ३२७८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्याने एकुण ९८.२२% मतदान झाले असुन भरघोस मतदान झाल्यामुळे तिनही पॅनलमध्ये चुरशीची लढत झाल्याचे दिसुन येत असून सगळ्यांचे लक्ष उद्याच्या निकालाकडे लागले आहे.

पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांची मतदान प्रक्रिया ही शहरातिल गो. से. हायस्कुल येथे एकाच ठिकाणी करण्यात आली होती. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नामदेव सुर्यवंनी तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सचिव बी. बी. बोरूडे यांनी कामकाज पाहीले.

सोसायटी मतदार संघ ११ जागांसाठी ३६ उमेदवार होते. त्यात दोन्ही तालुके मिळुन १५३४ मतदान पैकी १५०५ मतदान झाले. ग्रामपंचायत मतदार संघांच्या ४ जागांसाठी १२ उमेदवार होते. त्यात १२६८ मतदानापैकी १२४४ मतदान झाले. व्यापारी मतदार संघाच्या २ जागांसाठी ०८ उमेदवार रिंगणात होते. यात २७३ मतदारांपैकी २६४ मतदारांनी मतदान केले. तर हमाल मापाडी मतदार संघाच्या १ जागेसाठी ०३ उमेदवार होते. यात २७२ मतदानापैकी २६५ मतदान झाले.

मटन व शेवभाजीच्या पंक्तीत येथेच्छ ताव मारत मतदारांनी वाहत्या गंगेत धुतले हात.
————————————————

यावर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कधी नव्हे इतकी चुरस दिसून आली. यामागील कारण ही तसेच आहे कारण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक म्हणजे हा सहकार क्षेत्राचा पाया असून भविष्यात होऊ घातलेल्या ग्रामपचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा या निवडणुकीत आपलीच सत्ता राहिली पाहिजे हे गणित डोळ्यासमोर ठेवून आजी, माजी, आमदारांनी काम, दाम, दंड, भेद हे सगळ्या क्लुप्त्या वापरुन तसेच प्रचारसभा घेत मतदारांना खुष करण्यासाठी मटन, शेवभाजी व रोख रक्कम देतांना पाण्यासारखा पैसा वाटल्याने या निवडणुकीत भगळ्याच मतदारांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतल्यामुळे तिघही पॅनल कडून प्रत्येकी दिड ते दोन कोटी रुपयांचा चुराडा झाल्याची खमंग चर्चा पाचोरा, भडगाव तालुक्यातील गावागावातून ऐकायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या