मोसंबीची उच्यप्रत मिळवा किंमत जास्त, डॉ. संजय पाटील, प्रमुख शास्त्रज्ञ, फळपिक संशोधन केंद्र बदनापुर.

दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा~२७/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंप्री बुद्रुक प्र. पा. येथे मोसंबीच्या ऐन फळ पक्वतेच्यावेळी होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील फळगळ ही मोसंबी उत्पादक शेतक-यांशी निश्चितच क्लेशकारक आहे, आर्थिक नुकसानीच आहे आणि चिंताजनक आहे . यासाठी होत असलेल्या फळगळ प्रतिबंधित उपायोजना आवश्यक ठरतात. लागवडीच अंतर झाडाची छाटणी आणि वळण देण, अन्नद्रव्य व्यवस्थापन, झाडांच्या फाद्यांची व फळांची विरळणी, रोग निर्माण होणा-या घटकांच निर्दालन, जैविक बुरशीनाशंचा वापर, जमिनीतील सुक्ष्म जीवाणुची संख्या प्रतिजैविक निर्मिती व “संवर्धन भौतिक गुणधर्म, किडींची योग्यरित्या नियंत्रण आणि फळमाशीसाठी सापळयांचा वापर केल्यास उच्चप्रतिची मोसंबी उत्पादनासाठी आवश्यक आहे.
याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन मोसंबी बाग पहाणी करतांना व मोसंबी उत्पादक शेतक-यांसाठी फळगळ थांबविणे, उपया योजना व अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत कृषिकवी धोंडोपंत हरणे यांच्या शेतात ग्रामस्थ व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांत डॉ. पाटील प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये डॉ. हेमंत आहेती प्रमुख शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद यांनी मार्गदर्शन करतांना मोंबी फळपिक उत्पादन करतांना जैविक व अजैविक घटकांचा शिवाय सहाय्यकारी बुरशी व किडींच संवर्धन होण आवश्यक आहे यासाठी किड रोगामुळे होणारे नुकसान हे आर्थिक नुकसानीच्या पातळीवर नसतांना रसायनांचा वापर केल्यास अशा बुरशी व किटकांचा -हास होतो त्यामुळे किड रोग नियंत्रण करतांना – महागड्या औषधाची किंमत न बघता गुणधर्म व उपयुक्तता समजुन घेण गरजेच आहे शिवाय त्या किंतीच्या मानाने उत्पादनामध्ये खरोखरच वाढ होते का? याबाबतचा विचार व्हावा हि अपेक्षा केली.
उपविभागिय कृषि अधिकारी, नंदकिशोर नैनवाड, उपविभागिय कृषि अधिकारी, पाचोरा यांनी कृषि विभागाकडुन राबविणेत येत असलेले प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषि खाद्य उन्नयन योजना पंधरवाडयानिमित्त विविध प्रक्रिया उद्योगांना चालना देणेसाठी राबविणेत येत असलेली योजना सविस्तर माग्रदर्थ्यान करुन पोकरा अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन मिळणा-या लाभाविषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले. ताला कृषि अधिकारी, पाचोरा रमेश जाधव यांनी शेतकयांनी शेतक-यांसाठी चालविलेली आदर्श बाजार व्यवस्था निर्माण करणे आवश्यक का ? आहे याबाबतची कारणमिमांसा स्पष्ट केली व मोसंबी पिकासाठी पुढील महिन्यामध्ये शेतक-यांची शेतीशाळा वर्ग चवथा आयोजित करणेत येईल असे सांगितले.
प्रशिक्षण वर्गाला माजी जिल्हा परषिद सदस्य उध्दव मराठे, कृषि विद्यालय कोल्हे येथिल संस्थापक अध्यक्ष रमेश बाफना, कृषिकवी धोंडोपंत हरणे, सरपंच पती रणजित पाटील, आंनदा पाटील, नरेंद्र पाटील कृषि उत्पन्न बाजार समिती माजी सदस्य, अण्णभाऊ परदेशी – सावखेडा, संतोष नवलसिंग परदेशी, शिवलाल आप्पा व परिसरातील सुमारे १२५ शेतकरी बांधव उपस्थित होते. श्री हरणे यांनी कृषि कविता सादर करुन उपस्थिती वयाच्या ८५ व्या वर्षी नोदंविली हे विशेष आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी पिंप्री बुद्रुक प्र.पा. येथिल समस्थ ग्रामस्थ, कृषि विभागाचे पिंपळगांव मंडळातील मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व आत्म्याचे बीटीएम यांनी परिश्रम घेतले सुत्र ‘संचाल के.एफ. पाटील कृषि पर्यवेक्षक पिंपळगांव – २ यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. आर. मोहिते मंडळ कृषि अधिकारी, पिंपळगांव यांनी केले.