सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही,पाचोरा बसस्थानकावर टवाळखोर मुलांचा उपद्रव.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील मुले, मुली शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाचोरा शहरात येत असतात. हे शिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी ह्या एस. टी. बसणे प्रवास करतात. म्हणून घरुन आल्यानंतर पाचोरा बसस्थानकात उतरतात व तेथून पायी चालत आपापल्या शाळा, शाळा, कॉलेजपर्यंत जातात व सायंकाळी परत येऊन आपापल्या गावी जाण्यासाठी पाचोरा बसस्थानकात येऊन आपल्या गावी जाणारी एस.टी. बस केव्हा निघेल याची वाट पाहत बसलेल्या असतात.
याच संधीचा फायदा घेत काही शाळा, कॉलेजचे विद्यार्थी तसेच ज्यांचा शाळा, कॉलेजशी किंवा शैक्षणिक क्षेत्रात कुठलाही संबंध नाही. किंवा त्यांचा बसस्थानकात येण्यासाठी कोणतेही कारण नसतांना ते मुद्दामहून बसस्थानकात येऊन टवाळखोरी करतात. व या बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थीनींना त्रास होईल असे वर्तन करत असतात. तसेच मुलींच्या घोळक्याजवळ किंवा समोर बसून ही टवाळखोर मुले अश्लील भाषेत बोलणे, नको ती चित्रपटातील गाणी म्हणणे, मोबाईलवर गाणी वाजवणे, मोबाईलमध्ये कळत, नकळत मुलींचे फोटो काढण्याचा प्रयत्न करणे, जोरजोरात ओय, ओय असे ओरडणे तसेच शाळा, कॉलेजच्या रस्त्यावरुन सुसाट वेगाने दुचाकी चालवून कट मारणे, अगदी जवळून गाडी नेणे असे गैरप्रकार मद्दामहू करत असल्याने याचा शालेय विद्यार्थीनींना खुपच त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती काही विद्यार्थीनींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सत्यजित न्यूज कडे दिली असून सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी पोलिसाची नेमणूक करण्यात यावी व टवाळखोर मुलांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
(सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही)
खेडेगावातील मुली पाचोरा शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात व घराकडे जातात परंतु यादरम्यान त्यांना या टवाळखोर मुलांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. याबाबत त्या विद्यार्थीनींनी सांगितले की आम्ही जर हा प्रकार घरी सांगितला तर आमचे आईवडील म्हणतात की शाळा सोडून दे यामुळे आमची शिक्षण घेण्याची व स्वताच्या पायावर उभे राहाण्याची इच्छा असल्यावर ही आम्हाला शाळा सोडावी लागेल म्हणून आम्ही ह्या गोष्टी घरी सागु शकत नाही. म्हणून पाचोरा बसस्थानकात सकाळी दहा वाजल्यापासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त देऊन या टवाळखोर मुलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बाहेरगावाहून येणाऱ्या शेकडो विद्यार्थीनींनी केली आहे.