उषाताई ज्ञानेश्वर सोनार यांची पिंपळगांव, वरखेडी गटातून भाजपा तर्फे उमेदवारी ची मागणी

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०७/२०२२
आज दिनांक २८ जुलै गुरुवार रोजी जिल्यातील गटांचे राजकीय आरक्षण जाहीर झाल्याने ज्या, त्या गटातील इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. पिंपळगाव वरखेडी जिल्हापरिषद गट हा सर्व साधारण महिला राखीव झाल्याने या गटामध्ये वरखेडी येथील माजी सरपंच सौ. उषाताई ज्ञानेश्वर सोनार यांनी जिल्हापरिषद गटासाठी मोर्चे बांधणी सुरु केली असून भाजपा कडून उमेदवारी करण्याचे संकेत दिले आहेत.
या अगोदर सन २०१२ मध्ये सौ. उषाताई सोनार यांचा कुऱ्हाड वरखेडी गणातून थोड्याशा मताने पराभव झाला होता. त्या नंतर त्यांनी गणात व गावात सततचा जनसंपर्क ठेऊन वरखेडी या मोठया लोकसंख्येच्या गावाच्या सरपंच झाल्या, व २०१७ मध्ये त्यांचे पती ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांनी गटात सतत जनतेच्या सुख दुःखात सहभागी होउन समाज कार्यात सहभाग घेतल्याने २०१७ साली कुऱ्हाड गणातून तालुक्यात सर्वात मोठया फरकाने पंचायत समितीत निवडून आले होते.
तसेच सरपंच पदी उषाताई सोनार यांनी गावात रस्ते, गटारी, पेव्हर ब्लॉक अशी अनेक कामे केल्याने व अनेक मूलभूत प्रश्नांची जाण असल्याने पिंपळगाव, वरखेडी गटात बराच मोठा कार्यकर्त्यांचा समूह त्यांच्या सोबत जुडला असल्याने सौ. उषाताई सोनार यांना उमेदवारी द्यावी अशी या गटातील सर्वसामान्य जनतेतून मागणी असल्याने या भाजपा पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी साठी आग्रही आहेत. व तसे संकेत उषाताई सोनार व ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांनी दिले आहेत.