‘आई’ असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही.

दिनांक~२८/०७/२०२२
‘आई’ असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही.
—————————————
संसाराच्या मध्यंतरात पतीच कृपा छत्र हरवल्यावर आपल्या लेकरांवर पदरांन सावली धरून, पुन्हा जोमाने संसार उभा करणारी वासल्य सिंधू आई उर्फ काकू स्व सुलोचना दिनकरराव पाटील यांचे दिनांक 20-7-2022 रोजी निधन झालं, आणि डोळ्यासमोर पाहिलेला, ऐकलेला, अनुभवलेला, काळ येऊन गेला. स्वर्गीय तात्यासाहेब दिनकरराव पाटील यांचा राजकीय सामाजिक प्रवास, व त्या प्रवासात मोठ्या ताकदीने उंबरठ्या आडून साथ देणाऱ्या काकू, तात्या साहेबांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्रातून राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर घरी यायचे त्याकाळी त्या लोकांची सरभराई करताना काकूंनी कधीच मागे पुढे पाहिलं नाही, नांदत्या घरामध्ये सतत लोकांची वर्दळ असायची येणाऱ्या जाणाऱ्याला उपाशी पोटी कधीच जाऊ दिले नाही, तात्या साहेबांचा राजकीय आवाका फार मोठा होता दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य दूध फेडरेशन जळगाव ला चेअरमन तसेच भारताच्या पंतप्रधान आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्याशी तात्यांचे घनिष्ठ संबंध होते तसे फोटोज आजही त्यांच्या घरामध्ये आहेत, जिल्ह्याच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता अशा या समृद्ध जमीनदार घरामध्ये सून म्हणून आलेल्या काकूंनी तात्यांच्या दुखद निधनानंतर हा वारसा ताकदीनं चालवला टिकवून ठेवला ,मुला मुलींचे लग्न करून सर्वांना व्यवस्थितपणे सेटल करून पती निधनानंतरही खचून न जाता समर्थपणे संसाराची गावाची व तालुक्याची राजकीय दृष्ट्या जबाबदारी पार पाडली काकू दोन वेळा गावच्या सरपंच, पाचोरा शेतकी संघाच्या व्हाईस चेअरमन, विकास सोसायटी आंबेवडगाव च्या संचालिका अशी अनेक पदं भूषवले स्वतःच्या मुलाबाळांचा विचार करता करता परिवारातील इतर गावातील सर्वानवर प्रेम केलं, गावाचं ग्रामदैवत आई भवानीचा आशीर्वाद प्राप्त झालेला हा परिवार आज आईच्या जाण्याने पोरका झालेला आहे एका समृद्ध वारसा लाभलेले हे व्यक्ती महत्त्व आपल्यात नाही या गोष्टीवर विश्वास बसत नाही, या संपूर्ण वाघ परिवाराला आई भवानी दुःख पेलण्याचा बळ देईलच काकूंच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात् , पूर्ण मुदच्यते,
पूर्णस्य पूर्णमादाय, पूर्ण मेवा वशिष्यते।
ॐ शांति: शांति: शांतिः
संतोष पाटील