मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांची डॉ. कैलास पवार यांनी घेतली सदिच्छा भेट..

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०७/२०२२
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर ते त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आल्यावर त्यांच्या हितचिंतकांनी त्यांच्या घरी जाऊन जंगी स्वागत करत सत्कार व अभिनंदनाचा वर्षाव केला.
यात प्रामुख्याने पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील सुपुत्र व सद्यस्थितीत ठाणे हॉस्पिटलमध्ये सिव्हिल सर्जन म्हणून कार्यरत असलेले मा. श्री. डॉ. कैलास पवार यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी डॉ. कैलास पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदन केले.
नंतर मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे यांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल बद्दल सविस्तर माहिती जाणून घेत अजून काही विशेष सुविधांची गरज असल्यास त्या त्वरित पुरवण्यात येतील असे आश्वासन देऊन ठाणे हॉस्पिटलमध्ये सुरु असलेल्या कामकाजाबाबत व रुग्णांना मिळणाऱ्या चांगल्या सेवेबद्दल डॉ. कैलास पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.