तुमचा पॅन आधार सोबत लिंक केले नसेल तर होऊ शकतो पॅनकार्ड अवैध किंवा १० हजाराचा दंड लिंक करण्यासाठी आता सरकारची ३१ मार्च २०२१ पर्यंत शेवटची मुदत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०३/२०२१
तुमचा पॅन आधार सोबत लिंक केले नसेल तर होऊ शकतो पॅनकार्ड अवैध किंवा १० हजाराचा दंड
पॅनकार्ड आधारकार्ड सोबत (लिंक) जोडण्यासाठी सरकारने ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदत दिली आहे. सरकारच्या कर विभागाने दिलेल्या नव्या मुदतीपर्यंत आपण आपला आधार पॅनशी लिंक केला नाही तर यासाठी तुम्हाला भारी दंड भरावा लागू शकतो.
वित्त अधिनियम २०१७ च्या नियमात बदल झाल्यानंतर आधार आणि पॅन जोडणे बंधनकारक झाले आहे. पॅनकार्ड आधारकार्डशी जोडलेला नसेल तर पॅन अवैध होईल. आपल्या पॅनला आधारशी जोडण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे, आपण हे बायोमेट्रिक आधार पडताळणीद्वारे किंवा एनएसडीएल आणि यूटीआयटीएसएलच्या पॅन सेवा केंद्रांना भेट देऊन करू शकता. तसेच ५६७६७८ किंवा १६ ५६१६१ वर मॅसेज पाठवून हे करता येते. युआयडी पॅन स्पेस १२ डिजिट बेस स्पेस १० डिजिट पॅन (यूआयडीपीएएन १२ डिजिट आधार> १० डिजीटपॅन>) स्वरूपात संदेश पाठवता येईल.
तसेच आपण पॅन विभागास ई-फाइलिंग पोर्टल असलेल्या – www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून आधारशी लिंक करता येईल. जर आपला पॅनकार्ड आधारकार्डशी जोडलेला नसेल तर आयकर विभाग तुम्हाला दहा हजार रुपये दंड आकारू शकेल. यानंतर जेथे पॅनकार्ड आवश्यक असेल तेथे त्यांना कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही.त्यामुळे पॅनकार्ड धारकांनी आता आपलं आधारकार्ड येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत जोडावे लागणार आहे.