सागर चौधरी यांच्या प्रसंगसावधानतेनमुळे वरखेडी येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत चोरीचा प्रयत्न फसला.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत व डॉ. प्रितेष संकलेचा यांच्या घरी आज सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास चोर चोरीचा प्रयत्न करत असतांनाच वरखेडी येथील सागर अशोक चौधरी यांच्या प्रसंगावधानामुळे व त्याने हिंमतीने चोरट्यांशी दोन हात करत चोरट्यांना पळवून लावल्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला व पुढील अनर्थ टळला आहे. या सागर चौधरीच्या व त्याचे भाऊ योगेश चौधरीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी येथील अशोक यादव चौधरी यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना सकाळी जास्तच त्रास होत होता म्हणून वैद्यकीय उपचार करुन घेण्यासाठी ते लहान मुलागा सागर चौधरी याला सोबत घेऊन सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास डॉक्टरकडे निघाले रस्त्याने जात असतांना वाटेत बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखे समोरुन जातांना सागर चौधरी यांची नजर सहजपणे बॅंक ऑफ महाराष्ट्र कडे गेली तेव्हा त्यांना तोंडाला कापड बांधलेला एक तरुण नजरेत आला इतक्या सकाळी येथे हा तरुण काय करत असावा असा संशय मनात आल्यानंतर सागर चौधरी याने लांबुनच त्याचे बारकि निरीक्षक केले तेव्हा सागर चौधरी यांना त्यांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी संबंधित संशयित तरुणांकडे धाव घेऊन विचारपूस करण्यासाठी प्रयत्न करत असतांनाच संबंधित अनोळखी संशयिताने त्याच्या जवळील लोखंडी टामी हातात घेऊन सागर चौधरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु सागर चौधरी याने प्रसंगसावधानता राखुन संबंधित चोरावर झडप घातली तेव्हा चोराने स्वताचा बचाव करण्यासाठी सागर चौधरी याचेशी हातापयी करुन स्वताची सुटका करून घेत सोबत आणलेली दुचाकी गाडी नंबर एम. एच. १९ / टी. १८०८ टामी व हातोडा जागेवरच सोडून पळ काढला.
चोर पळून जात असल्याचे लक्षात येताच सागर चौधरीने आरडाओरडा करत मोठा भाऊ योगेश याला भ्रमणध्वनी करुन बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेजवळ त्वरित येण्यासाठी सांगितले त्यानुसार योगेश चौधरी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली तेथे गेल्यावर सागर चौधरी याने घडलेला प्रकार सांगितला लगेचच दोघे भावांनी डॉ. संकलेचा व आसपासच्या रहिवाशांना जागे करत चोराचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.
मात्र चोराचा शोध घेत असतांनाच बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखे समोर लोखंडी टामी हातोडा व थोड्याच अंतरावर स्वयंचलित दुचाकी नंबर एम. एच. १९ / टी. १८०८ आढळून आली. हा चोरीचा प्रकार लक्षात येताच योगेश चौधरी यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांना भ्रमणध्वनीवर घडलेला प्रकार सांगितला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे साहेब यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून उपस्थीतांकडून परिस्थिती जाणून घेत तपासकामी पुढील कारवाई सुरू केली आहे. याप्रसंगी वरखेडीचे पोलीस पाटील मा. श्री. बाळु कुमावत हे ही हजर होते.
महत्वाचे~
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे बॅग ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक किंवा इतर कर्मच्याऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच विशेष महत्वाचे म्हणजे चोरीच्या तपासासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे सी. सी. टी. व्ही. फुटेज जर त्वरित मिळाले तर चोराचा शोध घेणे पोलीसांना सोपे होणार आहे. परंतु रविवारची सुटी असल्याकू संबंधित बॅंक व्यवस्थापक हे बाहेरगावी असल्याकारणाने सी. सी. टी. व्ही. व या घटनेबाबत अधिक मिळवणे शक्य झाले नाही.
सुज्ञ नागरीकांचे मत~
घटनेची माहिती मिळताच संबंधित बॅंक व्यवस्थापक किंवा एखाद्या सक्षम बॅक कर्मचाऱ्यांना पाठवून तपासकामी पोलीसांना सहकार्य करणे व सी. सी. टी. व्ही. फुटेज काढून देणे अत्यंत गरजेचे होते मात्र बॅंके कडून पाहिजे तेवढे सहकार्य मिळाले नसल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे.