अशोका बिडकॉनची मनमानी, वाहनधारक व वाटसरुंच्या डोळ्यात पाणी.

स्वप्नील कुमावत (पाचोरा)
दिनांक=२०/११/२०२०
पाचोरा ते जळगाव रस्त्याचे काम सुरु असून हे काम अशोका बिडकॉनला देण्यात आलेले आहे. परंतु या रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून ठेकेदार मनमानी पणे वागत असून रस्त्याचे काम करतांना नगरपालिका ,ग्रामपंचायत हद्दीत काम करतांना कोणत्याही पूर्व सुचना न देता मनाला पटेल तेव्हा रहदारीची पर्यायी व्यवस्था न करता मशिनरी भररस्त्यात उभ्या करुन काम सुरु करतात.
या कारणांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. वाहतूक खोंळबल्यावर विशेष करून रुग्णवाहिका , दुध वाहतूक करणारी वाहने व दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या गरजूंना तासंतास थांबावे लागते.
शुक्रवार दिनांक २० रोजी कोणतीही माहिती न देता वाहतूकीसाठी पर्यायी व्यवस्था करुन सुचना फलक न लावता अचानकपणे दुपारी जळगाव चौफुली जवळ भररस्त्यात वाहने उभी करून रस्त्याच्या कामाला सुरवात केल्याने वाहतूकीस खोळंबा झाला. दुपारपासून तर रात्री साडेसात वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झालेली नव्हती.
याच कालावधीत या रस्त्यावर रुग्णालयात जाणारे रुग्ण ,रुग्णवाहिका तसेच दहावीच्या परिक्षेसाठी जाणारे विद्यार्थी ,महामंडळाच्या बसेस यांची तारांबळ झाली जळगाव चौफुली पासून जारगाव चौफुली तसेच जळगाव चौफुली ते जामनेर रस्त्यावरील निरंकारी सतसंग हॉल पर्यंत वाहनांची लाईन लागली होती.
तरी अशोका बिडकॉनच्या मनमानीला लगाम घालावा म्हणजे काही अनर्थ घडून जीवितहानी होणार नाही.अशी आपेक्षा वाहनधारक ,प्रवासी व पाचोरा वासियांनी केली आहे.