पाचोरा येथील नवीन आदर्श माध्यमिक विद्यालयातील मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०८/२०२३
सद्यस्थितीत सगळीकडे मुली व महिलांसाठी असुरक्षित वातावरण दिसून येत आहे. मुलींना छेडण्याचा तसेच इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मुलींनी स्वता सक्षम होऊन जागेवरच जश्यास तसाच प्रतिकार करुन उत्तर दिले तर नक्कीच अशा घटना थांबतील तसेच कुणाच्याही मदतीशिवाय मुलींमध्ये सुरक्षेशीतची भावना निर्माण व्हावी ही बाब लक्षात घेऊन शिंदे अकॅडमीचे अध्यक्ष मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांनी त्यांच्या संकल्पनेतून गिरणाई शिक्षण संस्था संचलित नवीन आदर्श माध्यमिक विद्यालयातील मुलींना त्वायक्वांदो, मार्शल आर्ट व सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण देण्यासाठी १५ दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.
या शिंदे अकॅडमी व गजराज स्पोर्ट अकॅडमी यांच्या सहयोगातून आयोजित १५ दिवसीय स्वसंरक्षण शिबिरात १४० मुलीं सहभागी झाल्या असून या मुलींना त्वायक्वांदो, मार्शल आर्ट डिफेन्सचे प्रशिक्षण शिबिरात तज्ञ प्रशिक्षक मा. श्री. सुनील मोरे व ऋतीका खरे यांच्या व्दारे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. या शिबिराचा उद्घाटन सोहळा पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. दिलीप गगणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. ललिता ताई पाटील.(महिला सुरक्षा पथक पाचोरा), सौ. जयश्री मराठे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एम. बी. देशमुख सर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौं. पूजा अमोल शिंदे यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए. एम. सायानी मॅडम यांनी केले. यावेळी श्रीमती. के. डी. पाटील, श्रीमती रीना महाजन उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.