पाचोरा शहरासह तालुक्यात खाद्यपदार्थांची उघड्यावर विक्री खवय्यांच्या आरोग्याशी खेळ अन्न व औषध प्रशासन कुंभकर्णी झोपेत
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०९/२०२१
जिभेचे लाड पुरवायचे असतील तर, खिश्याचा सल्ला घ्या असे म्हटले जाते परंतु आता आजच्या परिस्थितीत जिभेचे लाड पुरवायचे असतील तर आपल्या आरोग्याचा विचार करावा असे आमचे मत आहे.
तसेच ज्या हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहात साफसफाई व खाद्यपदार्थ योग्य रितीने बनवले व ठेवले जात नसतील अश्या ठिकाणी आपणच समजदारीने खाद्यपदार्थ खाण्याचे टाळून भुक भागवण्यासाठी केळी किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे इतर फळे घेऊन खाल्ली तर नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल यात शंका नाही.
पाचोरा शहरासह तालुक्यात सगळीकडे हॉटेल व्यवसायिक व लहान-मोठे उपहारगृह सुरू आहेत. या हॉटेल उपहारगृहात खाद्यपदार्थ निर्मिती करत असतांना योग्यप्रकारे साफसफाई ठेवली जात नसून, तयार झालेले खाद्यपदार्थ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उघड्यावर ठेवले जातात या कारणास्तव रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची धुळ या खाद्यपदार्थ बसते तसेच सध्या पावसाळी वातावरण असल्याने माशा मोठ्या प्रमाणात असून माशा या खाद्यपदार्थावर झडप घालतात या कारणांमुळे खाद्यपदार्थ दुषीत होतात व हे खाद्यपदार्थ खवय्यांच्या आरोग्यासाठी घातक करत आहेत.
म्हणून पाचोरा शहर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून कडक सूचना देत खाद्यपदार्थ झाकून ठेवण्यासाठी जाळ्यांचा वापर करत खाद्यपदार्थ बंदिस्त ठेवण्यासाठी भाग पाडावे तसेच ती रस्त्याच्या बाजूला ठेवू नये असे सूचित करावे. अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.