सत्यजित न्यूजची दाखल घेत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरु. तरीही बोगस डॉक्टरांचे दवाखाने सुरुच भाग, ३

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०७/२०२२
पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर चुकीचे उपचार झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक. भाग. २ या शीर्षकाखाली दिनांक २५ जूलै २०२२ सोमवार रोजी वृत्त प्रकाशित होताच या वृत्ताची दखल घेत पाचोरा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मा. श्री. समाधान वाघ यांनी लोहारा, कुऱ्हाड, अंबे वडगाव, वरखेडी, शिंदाड, पिंपळगाव हरेश्र्वर, लोहारी व इतर गावांना भेटी देऊन आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्यामार्फत गावात बोगस डॉक्टर आहेत किंवा नाही याबाबत माहिती जाणून घेत ज्या, ज्या गावातील वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांची माहिती जाणून घेत असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजकडे प्राप्त झाले आहे.
परंतु एकाबाजूला कर्तव्यदक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी कसून चौकशी करत असले तरी दुसरीकडे बऱ्याचशा गावातून आजही बरेचसे बोगस डॉक्टर चोरी, चोरी, चूपके, चूपके आपला गोरखधंदा करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अजूनही खेडेगावातील जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच या बोगस डॉक्टरांवर धडक कारवाई करण्यासाठी ज्या, ज्या गावात बोगस डॉक्टर असतील व त्यांची माहिती त्या, त्या गावचे सरपंच, पोलीस पाटील यांनी जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा पोलीस स्टेशनला दिलेली नसेल व त्या गावात बोगस डॉक्टर आढळून आले तर त्यांनाही दोषी धरुन त्यांच्या विरोधात कारवाई का करण्यात येऊ नये असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी विचारला आहे.
कारण काही ठिकाणी गावागावांतील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायतीच्या जबाबदार समितीचे पदाधिकारी हेच अश्या बोगस डॉक्टर व अवैध धंदे करणारांची पाठराखण करतांना दिसून येतात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करतांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागते असाही अनुभव येत असल्याचे दिसून येते. म्हणून कुणाचाही मुलाहिजा न ठेवता बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.