सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

शैक्षणिक
Home›शैक्षणिक›सत्यवान महाजन यांचा, सेवापुर्ती निमित्त गौरव.

सत्यवान महाजन यांचा, सेवापुर्ती निमित्त गौरव.

By Satyajeet News
June 9, 2022
1334
0
Share:
Post Views: 62
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०६/२०२२

पाचोरा तालुक्यातील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा गाळण बुद्रुक येथे प्राचार्य पदावर कार्यरत असलेले मा. श्री. सत्यवान शामराव महाजन हे दिनांक ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते नुकताच सेवापूर्ती गौरव करण्यात आला.

याबाबत अधिक वृत्त असे की मा. श्री. सत्यवान महाजन यांनी अखंडपणे ३० वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर ते नुकतेच सेवानिवृत्त झाले. मंगळवार दिनांक ०७ जून रोजी सकाळी ११ वाजता महालपुरे मंगल कार्यालय, भडगाव रोड , पाचोरा येथे त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, तथा माजी नगराध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नगरसेवक संजयनाना वाघ, प्रांत अधिकारी विक्रम बांदल, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील’ उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, तहसीलदार कैलास चावडे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकासतात्या पाटील, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ गाळण चे अध्यक्ष बाबूलाल राठोड, गटशिक्षणाधिकारी एन एफ चौधरी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले, समाज कल्याण निरीक्षक महेंद्र नन्नवरेआदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाजन सरांच सुपुत्र सचिन महाजन, सुकन्या शितल माळी, जावई दिपक माळी, व्याही विकास महाजन, स्नुषा पूजा महाजन, शाळा प्रतिनिधी आर एल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रांताधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्यवान महाजन सर व सौ मीनाताई महाजन यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नानासाहेब संजय वाघ, प्रांताधिकारी विक्रम बांदल, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील , तहसीलदार कैलास चावडे , गटशिक्षणाधिकारी यांनी एन एफ चौधरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक राजेंद्र चिंचोले, आदींनी महाजन सर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना सत्यवान महाजन सर यांनी कर्तव्य आणि कुटुंब यांची योग्य सांगड घालून दोन्ही क्षेत्रात मनासारखे यश मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाजन सरांच्या पालकत्वाचा गौरव करून स्वतःच्या मुलांना घडवण्यास सोबतच शाळेतील बालकांचा सुयोग्य विकास केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ओडिसा येथे कार्यरत आयएएस अधिकारी मनोज महाजन यांनी प्रास्ताविक केले. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले. या कार्यक्रम प्रसंगी श्री सत्यवान महाजन सरांचे नातेवाईक, मित्र ,आप्तेष्ट ,पाचोरा येथील विविध शाळा व संस्थांचे पदाधिकारी, विविध राजकीय व सामाजिक संस्था संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

दोन वर्षांपूर्वी बनावट लग्न लावून फसवणूक करणाऱ्या ...

Next Article

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या शेतातच वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गप्रेमी संतप्त.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • शैक्षणिक

    साजगाव येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.

    October 9, 2021
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली धमाल.

    January 14, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलची ११ व्या वषीॅ हि गरुडझेप कायम.

    June 3, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    गरुड विद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन उत्साहात साजरा.

    August 13, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार.

    May 15, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    श्रीकृष्ण विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश.

    June 17, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त, पाचोरा रोटरी क्लब तर्फे आयोजित रक्तदान शिबीर संपन्न.

  • फोटो क्लीप

    डॉ. भरतदादा पाटील यांना मातृशोक.

  • ब्रेकिंग न्यूज

    उद्या भरणारा वरखेडी येथील आठवडी बाजार बंदचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज