पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वन बूथ टेन युथ सशक्तिकरण संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२३
पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वन बूथ टेन युथ सशक्तिकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत हे अभियान राबविण्याची जबाबदारी अमळनेरचे आमदार मा. श्री. अनिल पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
भविष्यात येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून बूथ सशक्तिकरण संदर्भात आज दिनांक ४ जून २०२३ रविवार रोजी माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची व बूथ प्रमुखांची बैठक संपन्न झाली. यावेळी अमळनेरचे आमदार मा. श्री. अनिल भाईदास पाटील यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने उत्तर महाराष्ट्राच्या बूथ सशक्तिकरण अभियानाची प्रमुख जबाबदारी दिली असून त्यांच्यासोबत जिल्हा प्रवक्ते योगेश देसले यांच्यावर जिल्हाप्रमुख म्हणून कामकाजाचा भार सोपवला आहे.
याच संदर्भात आज पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील बूथ प्रमुखांनी प्रत्येक गावात जाऊन बूथ सशक्तिकरण यशस्वीपणे राबवण्याचे आव्हान केले. तसेच वन बूथ, टेन युथ ही मोहीम यशस्वी करण्यात येईल असे आश्वासन माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमोर दिले.
यावेळी माजी नगरसेवक संजय वाघ. विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे,तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, खलील देशमुख, भडगाव तालुकाध्यक्ष श्यामकांत भोसले, शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, सतीश चौधरी, रणजीत पाटील, योजना ताई पाटील ,रेखाताई पाटील, पिंटू भामरे, नाना पाटील, विजय देशमुख ,भगवान मिस्तारी, ए.जे. महाजन, सत्तार मिस्तरी ,रजत भाई, प्रकाश भोसले, विजय पाटील, सुदाम वाघ, बाबाजी पाटील, अरुण सोनवणे ,सुनील पाटील, विनोद पाटील, दीपक पाटील, नितीन पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील ,माणिक पाटील, विनोद पाटील ,अविनाश सुतार, एन .सी .पाटील, हर्षल पाटील, गौरव शिरसाट,आदी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.