स्व. आर. ओ. तात्या यांच्या स्मृतिस्थळाला कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली भेट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०३/२०२३
पाचोरा तालुक्यातील निर्मल सांडस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील. यांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पाचोरा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी यांनी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात जाऊन तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील. यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन पुष्पांजली वाहिली पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी आशिर्वाद घेतले.
यावेळी सचिन सोमवंशी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पत्रकारिता क्षेत्रात काम करतांना स्व. तात्यासाहेबांच्या सहवासातील काही महत्त्वाच्या गोष्टी व क्षण सांगितले तसेच स्व. तात्यासाहेबांनी लढवल्या दोघ विधानसभा निवडणुकीत सचिन सोमवंशी यांनी चांगल्याप्रकारे बाजू मांडून एक प्रकारे स्व. तात्यासाहेबांची धुरा सांभाळली होती. म्हणून स्व. तात्यासाहेब विजयी झाल्यानंतर प्रथम सचिन सोमवंशी यांना बोलावून त्यांच्या लिखाणाबद्दल कौतुकास्पद शाबासकी देत आभार मानले होते तसेच स्व. तात्यासाहेब हे सगळ्यात श्रीमंत होते कारण अमाप संपत्ती सोबतच मनाची श्रीमंती खुप मोठी होती असा विकासाचा महामेरू आज आपल्यात नसल्याची खंत व्यक्त केली.
याप्रसंगी कॉंग्रेस सोशल मीडियाचे तालुका अध्यक्ष कल्पेश येवले देखिल उपस्थितीत होते.