अमोल शिंदे यांच्या प्रयत्नांना दणदणीत यश, पाचोरा व भडगाव तालुक्यातील त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/११/२०२२

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सतत धडपडणाऱ्या मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांनी पाचोरा, भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरुन निघावे म्हणून त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मंत्री मा. श्री. गिरीश महाजन यांना साकडे घातले होते. याची तात्काळ दखल घेत पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून त्यांनी हा विषय त्वरित मार्गी लावला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वाणेगाव,निंभोरी लासुरे,लोहारी व मोंढाळेसह पाचोरा व भडगाव तालुक्यातील काही भागांत दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ मंगळवार रोजी सकाळी ४ वाजता ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले आणि हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास या पावसाने हिरावून घेतला.आणि ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात शेतकरी मोठ्या संकटात सापडले.शेतकरी अशा कठीण व संकट काळात असतांना दिवाळी कशी साजरी करावी. म्हणुन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिवाळीच्या दिवशी त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या थेट बांधा, बांधावर जाऊन या शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी केली होती. आणि त्यांना धीर दिला होता. पावसामुळे या परिसरातील कापुस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी व इतर पिके पाण्यात पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती.

या संदर्भात भाजपाचे तालुकाध्यक्ष मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांची आज दिनांक ०२ नोव्हेंबर २०२२ रोजी भेट घेऊन ज्याप्रमाणे मागील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाचोरा तालुक्यातील वाणेगाव, निंभोरी, लोहारी,लासुरे, मोंढाळेसह पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील काही गावांमध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली.

या मागणीची दखल घेत मंत्री मा. श्री. गिरीश महाजन यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी धडपडणाऱ्या अमोल शिंदे यांचे कौतुक करत कुठलाही विलंब न करता सदर विषय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तात्काळ मार्गी लावला असून लवकरच ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पाचोरा, भडगाव व मा. श्री. अमोल शिंदे यांच्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मंत्री गिरीश महाजन व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या