अंकुर सीड्स प्रा.ली.नागपूर कंपनीतर्फे अंबे वडगाव जिल्हापरिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०४/२०२२
अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड बियाणे क्षेत्रातील कंपनी नागपूर तर्फे व अंकुर सीड्सचे व्यवस्थापक मा. श्री. राहुल निकम जिल्हा प्रतिनिधी यांच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील अंबे वडगांव येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत अंबे वडगाव येथील प्रथम नागरिक सरपंच ग. भा. कलाबाई शेळके यांच्या हस्ते व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. भोलाभाऊ शेळके, ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. मंगेशराव गायकवाड प्रमुख उपस्थित इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना २०० वह्या व २०० नोटबुकांचे मोफत वाटत करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत बियाणे क्षेत्रातील नामांकित कंपनी अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या माध्यमातून इयत्ता १ ली ते ४ वी पर्यंतच्या २०० विद्यार्थ्यांना वह्यांनसह नोटबुकचे मोफत वाटप करण्यात आले. वह्या व नोटबुक वाटप करतेवेळी श्री. धनदाई कृषि केंद्राचे संचालक मा. श्री. संजय प्रभाकर पाटील, समर्थ कृषी केंद्राचे संचालक मा. श्री. विनोद पाटील, प्रहार संघटनेचे मा. श्री. संतोष पाटील, मा. श्री. कैलास पाटील, मा. श्री. मिलिंद भुसारे, मा. श्री. मुकेश पाटील, राहुल शेळके, दिवाकर वाघ, अमोल पाटील, राजू देवरे, शशिकांत पाटील, डॉ. शामकांत पाटील हे उपस्थित होते.
यावेळी अंकुर सीडसचे जिल्हा प्रतिनिधी या. श्री. राहुल निकम यांनी शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देणाऱ्या अंकुर सीडस कंपनीच्या बागायती व कोरडवाहू मोठ्या बोंडाच्या अंकुर किर्ती व अंकुर हरीश बी. जी. २ (टु) या नवीन वाणांच्या विषयी सविस्तर माहिती देऊन येत्या हंगामात शेतकऱ्यांनी या वाणाची जास्तीत जास्त लागवड करुन भरघोस उत्पन्न पदरात पाडून घ्यावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकुर सीडसचे पाचोरा, भडगाव प्रतिनिधी बबलू तडवी व जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेतील शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.