पाचोरा येथील बोहरा हॉलमध्ये आज मोफत डोळे तपासणी शिबिर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/११/२०२२

पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात बोहरा हॉलमध्ये आज स्वर्गीय अमोल शिंदे यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने तसेच सोशल मीडिया अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व सचिन सोमवंशी युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात मोफत डोळे तपासणी, शस्त्रक्रिया, बिन टाक्याचे फेको पद्धतीने ऑपरेशन, अल्कोन इफिनीटी ओझील अमेरिकन फेको मिशन द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. सदरच्या शिबिरातील रुग्णांनाचे डोळ्याच्य पडद्याचे स्कॅन व डोळ्याच्या पडद्याचे सोनोग्राफी व डोळ्यांच्या पडद्यासाठी लेझर सुविधा पडद्यांची बिनाटाक्याची शस्त्रक्रिया मोफत स्वरूपात होणार आहे. सदरचे शिबीर हे बाहेरपुरा भागातील कामगार कल्याणच्या शेजारी बोहरा हॉल येथे सकाळी १० ते दुपारी ०२ पर्यंत शिबिरात येऊन जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे संयोजकांनी आव्हान केले आहे.