दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून पाचोऱ्यात तरुणाचा खून, पाच संशयित ताब्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२२
(पाचोरा शहरासह तालुक्यातील अवैधधंदे व वाढती गुंडागर्दी याबाबत सविस्तर)
{गुमनाम है कोई, बदनाम है कोई}
या शिर्षकाखाली लवकरच रोखठोक बातमी.
पाचोरा शहरातील गुन्हेगारीने तोंड वर काढले असून शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळे समोरील मोकळ्या जागेत रविवारी संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटात लाठ्या काठ्या, चॉपर ,फायटरचा वापर करत तुंबळ हाणामारी झाली. यात शहरातील पुनगाव रोड लगत असलेल्या दुर्गा नगर भागातील २३ वर्षीय युवक भूषण नाना शेवरे याचा खून झाला आहे.
घटना घडल्यानंतर सनी रवींद्र देवकर वय २३ रा.गाडगेबाबा नगर याचे फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात सकाळी ३ वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तात्काळ पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मागील अनेक वर्षापासून पाचोरा शहरात किरकोळ वादविवाद सोडल्यास सर्वदूर शांतता होती. परंतु अनेक वर्षांनंतर पाचोऱ्यात खुनाचा गुन्हा घडल्याने खळबळ उडाली असून शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुंडगिरीला चाप लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे असे म्हटले जाते, परंतु पाचोरा शहरासह तालुक्यातील वाढते अवैधधंदे व वाढती गुंडागर्दी ही इतकी फोफावली आहे की याबाबतीत विचार करणारांचे डोके चक्रावून जाईल. म्हणून हे वाढते अवैधधंदे व वाढती गुंडगिरी कशामुळे वाढते आहे. यांचे पाठीराखे कोण, हे शोधण्यासाठी सगळ्यांनीच आवाज उठवला पाहिजे हे मात्र निश्चित.