पत्रकारिता क्षेत्रातील लेखणीचे शिलेदार, मा. श्री. संदिप भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस यानिमित्ताने जेष्ठ पत्रकार अनिल आबा येवले.

मैत्री करावी तर मीच दुश्मनी करायची असेल तर मीच कोणाची कुंडली काढायची असेल तर ते काढू शकतो फक्त मीच मी कोणाच्या रस्त्यात येत नाही आणि कोणी माझ्या रस्त्यात आला तर मी त्याला सोडात नाही. तो व्यक्ती म्हणजे मीच.
पाचोरा शहरातील देशमुखवाडी भागातील रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय आण्णासाहेब श्री दामोदर लोटन महाजन यांनी बालवयात वर्ग ८ वी मध्ये शिक्षण घेत असतांना भारत स्वातंत्र चळवळीत सहभाग घेतल्याने इंग्रजांनी त्यांना येरवडा जेल मध्ये ६ महीन्याची शिक्षा सुनावल्याने त्यांनी बालवयातच तो कारवास भोगला स्वातंत्र्यानंतर पाचोरा नगरपालिकेत ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर अधिकारी काम केले. त्यांनी आपली नोकरी देखील इमानदारीने करून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला.
त्यांचे एकमेव सुपूत्र श्री. संदीप दामोधर महाजन लहानपणापासून एक अवलिया म्हणून ओळख आहे. पाचोरा शहरात शिवसेनेचे प्रथम शिवसैनीक व भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख असतांना पाचोरा कॉलेज मधील विद्यार्थ्यासाठी संघर्ष करणारे वेळे प्रसंगी आंदोलन, मोर्चा, उपोषणाचा मार्ग अवलंबुन सतत चळवळीत राहुन महाविद्यालयीन निवडणुकीत भाग घेऊन १९८८ मध्ये पुणे विद्यापीठ प्रतिनिधित्व केलेले मित्रांना सहकार्य करीत असे तसेच कॉलेजमध्ये होणाऱ्या गॅदरिंग मध्ये अनेक गाण्यांवर डान्स करून याराना चित्रपटातील गाण्यांवर लायटींगचा डान्स करून आजही पंचक्रोशित स्मरणात असलेले सर्वांचे आवडते मित्र संदीप महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.
संदीपभाऊनी आपल्या संघर्षमय जिवनाचा प्रारंभ मेटॅडोर वाहन चालका पासुन केला अडीच वर्ष वाहन चालक म्हणुन कामकेल्या नंतर ते शिक्षणासोबत सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले श्री.गो.से हाॅयस्कूलचे मराठी – इतिहास विषयाचे माजी शिक्षक, ध्येय करिअर अँकेडमीचे संचालक ध्येय CT केबल & You tube चॅनलसह वेब न्युज, सा. झुंजचे संपादक विद्यार्थी-पालक यांचे उकृष्ट समोपदेशक व मार्गदर्शक, कुशल संघटक SDM मर्ल्टी सर्व्हीसेस आणि साई ट्रेडींग कंपनीचे प्रो.प्रा. पाचोरा ता.सह.संस्थेचे माजी संचालक म्हणुन ओळखले जाणारे संदीपभाऊ.
चुकीचे काम करत नसल्याने कधीच परिणामांची चिंता केली नाही . ठाम विचार असलेले प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिक असल्याने कशाचीही भिती व पर्वा न बाळगली नाही त्यांनी ते ध्येय न्यूज या चॅनलचे संपादक आहे त्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्न आवाज उठवले आहे ध्येय न्यूज चैनल च्या माध्यमातून सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत असतात कुणालाही न घाबरता कोणाच्या दबावाला न पडता कुठल्याही होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्याची ताकद ठेवतात आज पर्यंत त्यांनी चांगल्या चांगल्या लोकांना जेरीस आणले असून त्यांचा नाद कोणी करत नाही सर्व राजकीय पक्ष & नेते यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असून सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी देखील त्यांचे हितसंबंध चांगले आहे संदीप महाजन डेरिंगबाज पत्रकार असून ज्यांनी चुकीचे काम केले त्यांना वेळेप्रसंगी पाचोरा ते सुप्रीम कोर्टापर्यंत खेचतात त्यांनी नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असून न्याय देण्यासाठी वेळप्रसंगी खिशातून पैसे खर्च केल्याचे अनुभव आहेत अनेकांच्या सुखदुःखा त नेहमी मदतीचा हात देतात त्यांचे एक विशिष्ट आजचा दोस्त उद्याचा दुश्मनी होऊ शकतो आजचा दुश्मन उद्याचा मित्रही होऊ शकतो त्यामुळे दोस्ती करावी तर मीच दुश्मनी करावी तर मीच अशा या अवलियाचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या अरबो- खरबो शुभेच्छा🌹
🔹 *शब्दांकन* 👉 *अनिलआबा येवले ( पत्रकार )