वरखेडी येथील पी.डी.बडोला माध्यमिक विद्यालयात, दहावीची परिक्षा शांततेत सुरू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०३/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालयात दहावीची परिक्षेस सुरुवात झाली असून, या परिक्षा उपकेंद्रावर एकुण १३४ परीक्षार्थी विद्यार्थी परिक्षा देत आहेत. या परीक्षार्थींना व्यवस्थित बसून शांततेत उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी एकुण सहा शाळा खोलींमध्ये प्रत्येकी पंचवीस या प्रमाणे आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व इतर व्यवस्था करण्यात आली आहे.
काल पहिल्या दिवशी सकाळी १०:३० वा. पेपर शांततेत सुरू झाला. यावेळी पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशन तर्फे काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला. या ठिकाणी पो.ना.पांडूरंग चव्हाण हे परिक्षा बंदोबस्तावर आहेत.
पाहणी साठी स.पो.नि. महेंद्र वाघमारे व पो.कॉ.विकास पवार, चालक पो.ना. दिपक अहिरे यांनी परिस्थिती न्याहाळली.
गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.सी.चौधरी, पर्यवेक्षक एस. के. पाटील व सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी परिक्षा केंद्राच्या आवारात कोणत्याही बाजूने कुणी शिरकाव करू नये यासाठी मेहनत घेतली.