गरुड महाविद्यालयात उद्योजकांसाठी एक दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(शेंदुर्णी)
दिनांक~०७/१०/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात, दिनांक ७ ऑक्टोबर गुरुवार रोजी उदयन्मुख उद्योजकांसाठी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचे केसीआयआयएल आणि अ.र.भा.गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी केआयईडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील नवतरुण उद्योजकांसाठी एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन सकाळी दहा वाजता. महाविद्यालयाच्या आचार्य कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले होते.
कार्यशाळेमध्ये विद्यापीठाच्या वतीने सहभागी होणारे मार्गदर्शक चार्टर्ड इंजिनियर श्री.निखिलजी कुलकर्णी (इंक्युबेशन मॅनेजर, केसिल कबचौ उमवि, जळगाव) यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनात सरांनी केसिल करत असलेले कार्य, त्याचप्रमाणे त्याचा उद्योजक, भावी उद्योजक यांना होणारा फायदा, कार्याचे स्वरूप व्यवस्थित समजावून सांगितले.त्याच प्रमाणे भविष्यात महाविद्यालय आणि विद्यापीठ केसील तसेच KIEDC उद्योजकांच्या प्रगतीसाठी कशा पद्धतीने कार्य करेल त्याचे नियोजन समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे सचिव श्री. सतीश चंद्र काशीद यांनी भविष्यात उद्योजकांना असलेल्या संधी आणि उद्योजकतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम यांचा आढावा घेतला. श्री.काशीद यांच्या हस्ते ई-प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून व्हिडीओ स्वरूपात महाविद्यालयाच्या केआयइडीसी चे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला गावातील नामांकित उद्योजक उपस्थित होते. त्यात राष्ट्रपती पदक प्राप्त तसेच अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त जगताप कुटुंब, श्री. नीरज अग्रवाल, श्री गणेश गुजर, श्री रवींद्र गुजर, श्री सुनील गुजर ,श्री.प्रदीप पायघन,श्री अजय अस्वार,श्री शुभम बारी,श्री गौरव बारी, अक्षय गवळी व इतर व्यवसायिक, उद्योजक होऊ पाहणारे महाविद्यालयाचे माजी, व विद्यार्थी प्रत्यक्ष पद्धतीने सहभागी झाले होते.
त्याच प्रमाणे युट्युब लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून जवळपास १५० जणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमात केआयइडीसीचे हेड उपप्राचार्य डॉ.श्याम साळुंखे यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमाच्या आयोजक, केआयइडीसी समन्वयक डॉ.योगिता चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.डॉ. सुजाता पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तसेच त्यांचा कबचौ उमवि,जळगाव येथे वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यामंडळ सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांना देण्यात आलेल्या कलमाचे वृक्षारोपण महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय भोळे,उपप्राचार्य प्रा.निरुपमा वानखेडे,डॉ.प्रशांत देशमुख, प्रा. आप्पा महाजन, डॉ.महेश पाटील,डॉ.शरद पाटील,डॉ.भूषण पाटील डॉ.ए.एन.जिवरग, डॉ.वसंत एन.पतंगे, प्रा. किरण बेडीस्कर प्रा. नम्रता गरुड सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आभार आयक्यूएसी चे समन्वयक डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी मानले.