सीए होणे झाले सोपे या विषयावर गरुड महाविद्यालयात विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन. .
डॉ.योगिता चौधरी.(शेंदुर्णी)
दिनांक~३०/१२/२०२२
धी. शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसा. लि. शेंदुर्णी संचलित
आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात चार्टट अकाउंटंट श्री. मुकेशजी अग्रवाल, भुसावळ यांनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करियर कौन्सिलिंग प्रोग्रामच्या अंतर्गत भविष्यामध्ये असलेल्या करिअरच्या संधी याबद्दल मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकत नाही हा गैरसमज दूर व्हावा तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चार्टर्ड अकाउटंट होण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी सरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट कोर्स याबद्दल मार्गदर्शन केले. मेहनत आणि योग्य नियोजनाच्या बळावर कमी कालावधीत आपण कसे परीक्षा पास करू शकतो या संदर्भातील उत्तम मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्राप्त झाले.
सदर कार्यक्रमात एकूण १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा. श्री .संजय दादा गरुड, सचिव मा. सतीश चंद्रजी काशीद, महिला संचालिका मा. उज्वला ताई काशीद, सहसचिव मा. दीपक भाऊसाहेब गरुड, वसतिगृह सचिव मा. कैलास भाऊ देशमुख तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील. यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे यांनीकार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. तर प्रा. प्रमोद सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले . डॉ. योगिता चौधरी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. आप्पा महाजन, उपप्राचार्य प्रा. पी. जी. सोनवणे, एन. बी. वानखेडे, संदीप कुंभार, वर्षा लोखंडे, रीना पाटील, मुकेश पाटील, योगेश चौधरी व अतुल जहागीरदार (पत्रकार) यांनी उपस्थिती लावली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक पाटील यांनी केले. तर आभार छाया पाटील यांनी मानले.