पाचोरा वकिल संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा ॲड. प्रविण पाटिल तर उपाध्यक्षपदी ॲड. मंगेश गायकवाड विजयी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०१/२०२३

पाचोरा येथील वकील संघाच्या सण २०२३ करीता नूतन कार्यकारणी निवडीसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत पाचोरा वकिल संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा ॲड. प्रविण पाटिल हे २० मतांच्या आधाडीने तर उपाध्यक्षपदी ॲड. मंगेश गायकवाड हे २२ मतांच्या आधाडीने विजयी झाले. तसेच सचिव पदावर ॲड. राजेंद्र पाटील व लायब्ररी सचिव पदावर ॲड. कालिदास गिरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून पाचोरा वकील संघाची निवड प्रक्रिया ही सर्वांमध्ये बिनविरोध होत होती. मात्र यावर्षी ही प्रक्रिया बिनविरोध न होता लोकशाही मार्गाने मतदान प्रक्रियेने झाली. या प्रक्रियेत चुरशीची अशी लढत होऊन अध्यक्ष पदासाठी शेवटच्या दिवसापर्यंत ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र एक उमेदवाने माघार घेतल्याने निवड प्रक्रिया होतांना फक्त दोन उमेदवारांची समोरासमोर लढत होऊन अध्यक्षपदासाठी ४९ विरुद्ध ६९ मतांच्या विभागणीत ॲड. प्रविण पाटील हे २० मतांच्या आधाडीने निवडून आले. विशेष म्हणजे प्रविण पाटील हे मागील सात वर्षांपासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आठव्या वर्षी सुध्दा त्यांनी त्याचे अध्यक्षपद कायम ठेवले आहे. यामागील कारण म्हणजे त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व अभ्यासू वृत्ती हे आहे.

या निवडणूक प्रक्रिया होण्याअगोदरच सचिव पदासाठी ॲड. राजेंद्र पाटील तर लायब्ररी सचिव पदासाठी ॲड. कालिदास गिरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. तसेच कार्यकारणी पदासाठी ॲड. बी. जी. महाजन, ॲड. वहाब देशमुख, ॲड. डी. आर. पाटील, ॲड. भिकुबाई पाटील व ॲड. भाग्यश्री महाजन यांची सर्वानुमती नियुक्ती करण्यात आली. निवड प्रक्रिया शांतते पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. रणसिंग राजपूत तर सहाय्यक म्हणून ॲड. गोपाल पाटील, ॲड. संजय देवगया, ॲड. कैलास सोनवणे, ॲड. मानसिंग सिध्दु यांनी सहकार्य केले. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ब्रेकिंग बातम्या