बिलखेडा येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.
सुमीत पाटील.(वावडदा)
दिनांक~०९/११/२०२१
वावडदा तालुक्यातील बिलखेडा येथील अल्पभूधारक शेतकरी माधवराव श्रावण कुभांर यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
माधवराव श्रावण कुभांर वय ६२ यांनी २.१५ गळफास घेऊन आत्महत्या केली ते वंशपरंपरागत कुंभार व्यवसाय व शेती वेवसाय करत होते. त्यांच्याजवळ फक्त चार एकर शेतजमीन होती. परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. या कारणास्तव शेती कसण्यासाठी लागलेला खर्चही हाती न आल्यामुळे माधवराव आर्थिक अडचणीत सापडले होते.
कारण शेती करण्यासाठी व संसाराचा गाडा ओढतांना घरखर्च, दवाखाना व इतर खर्च होत असतांनाच डोक्यावर खाजगी कर्जचा डोंगर उभा होता. व त्या कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असे गावातील चर्चेतून कळते.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील मकुंदा पाटील यांनी एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनला खबर दिल्यावरुन सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले. पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील पाटील. हेमंत पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
त्यांच्या पाश्चात्य पत्नी १ मुलगी.२ मुले असा परिवार आहे. माधवराव यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.