पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. महेंद्र वाघमारे यांची नियुक्ती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांची पदोन्नती झाल्यामुळे बदली झाली असून त्यांचे जागी महेंद्र वाघमारे यांची नियुक्ती करण्यात करण्यात आल्याचे आजच माहित झाले आहे.
मा.श्री. कृष्णा भोये साहेबांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारल्यापासून त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावागावातील अवैधधंद्याबाबत सविस्तर माहिती काढून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने धाडसत्र राबवून अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणून सोडले होते. पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्वप्रकारचे अवैधधंदे बंद करण्यासाठी त्यांनी सतत मोहीम सुरुच ठेवली होती. परंतु त्यांची पदोन्नती झाल्यामुळे त्यांची बदली झाली त्यामुळे इच्छा असूनही त्यांची अवैधंद्याचे विरोधातील वॉश आऊट मोहीम अपूर्ण राहिली आहे.
परंतु आता नव्यानेच पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला हजर होणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. महेंद्र वाघमारे साहेब या मोहिमेत सातत्य ठेवून पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड, वरखेडी, सावखेडा, लोहारा या गावातील तसेच विशेषकरून आजच्या परिस्थितीत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतच नव्हे तर पाचोरा तालुक्यात अवैधधंद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुऱ्हाड या गावातील सट्टा, पत्ता (जुगार), गावठी दारू व देशी दारुची अवैधपणे विक्री होणारी दारु यासह सगळ्या प्रकारचे अवैधधंदे बंद करुन सर्वसामान्य जनता व हजारो माता, भगिनींना शांततामय जीवन जगण्यासाठी वातावरण निर्मिती करतील अशी आशा बाळगूया.