कळमसरा येथील देवीचा यात्रा उत्सव बंद मात्र पोलिसांच्या साक्षीने जुगार सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथे सालाबादप्रमाणे दरवर्षी देवीची यात्रा भरते परंतु यावर्षी कोरोनाचे संकट कायम असल्याकारणाने यात्रेला परवानगी नसल्याने यात्रा बंद आहे.
पोलिसांनी याच परिसरात शेव, मुरमुरे खाऊन यात्रेत सहभाग नोंदवला.
परंतु दुसरीकडे याच मंदिराच्या जवळ सकाळपासूनच जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरु असल्याने धार्मिक कार्यक्रम बंद व अवैधधंदे सुरु असल्याची खंत सुज्ञनागरिक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विषेश म्हणून संबंधित ठिकाणी जुगार सुरु असल्याबद्दल काही नागरिकांनी पोलिसांना फोटो सह पुरावा देत कारवाईची मागणी केली होती. परंतु कारवाई करणे तर दुरच मात्र सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेचे दरम्यान पोलिसांच्या समोर राजरोसपणे जुगाराचे अड्डे सुरु होते. व कायद्याचे रक्षक मात्र हाताची घडी तोंडावर बोट अशा पद्धतीने उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत असल्याने कळमसरा येथील नागरिकांनी अजूनच संताप व्यक्त केला आहे.
(पोलिस आले तसे गेले जुगाराचे अड्डे सुरुच)