सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे पिंपळगाव हरेश्वर येथे धावण्याच्या (मॅरेथॉन) स्पर्धाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे १९ फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धावण्याच्या (मॅरेथॉन) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मानवी जीवनात निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. यात महत्त्वाचा व्यायाम म्हणजे धावणे म्हणून धावत रहा, निरोगी रहा असा संदेश देत पिंपळगाव हरेश्वर येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे धावण्याच्या (मॅरेथॉन) स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहेत. या भव्य मॅरेथॉन स्पर्धाचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेत पुढील प्रमाणे धावण्यासाठीचे अंतर व बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
या स्पर्धेत पुरुषासाठी ०५ किलोमीटर धावणे प्रथम बक्षीस (७०००/००) रुपये व ट्रॉफी, व्दितीय बक्षीस (५०००/००) रुपये व ट्रॉफी, तृतीय बक्षीस (३०००/००) व ट्रॉफी, चतुर्थ बक्षीस (२०००/००) रुपये
ट्रॉफी तसेच सर्वोत्तम १५ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पदक (मेडल्स) देण्यात येणार आहेत.
महिलासांठी ३ किलोमीटर धावणे प्रथम बक्षीस (५०००/००) रुपये व ट्रॉफी, व्दितीय बक्षीस (३०००/००) रुपये व ट्रॉफी, तृतीय बक्षीस (२०००/००) रुपये व ट्रॉफी, चतुर्थ बक्षीस (१०००/००) रुपये व ट्रॉफी तसेच सर्वोत्तम ५ स्पर्धकांना उत्तेजनार्थ मेडल्स देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी १४ वर्षा पुढील तरुणांना भाग घेता येणार असून प्रवेश फी २०/०० मात्र ठेवण्यात आली असून स्पर्धांंची सुरवात दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी सकाळी ०७ वाजेपासून होणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी
९६३७६१६३७७/९५९५०२०९२९/९५९५७४१५७३/९७६७५४५४९७
या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नाव नोंदणी करु शकतात.
स्पर्धेचे नियम अटी पुढील प्रमाणे असून अंतिम निर्णय आयोजकांचा राहील.
१) स्पर्धेच्या नियमात, नियोजनात बदल करण्याचे सर्व अधिकार आयोजकांकडे राहतील. २) बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणप्रन्त्र देऊन गौरविण्यात येईल.
ठिकाण~ पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा, जि. जळगाव महाराष्ट्र पिन.४२४२०३