शिंदाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा उदघाटन सोहळा संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०१/२०२२
जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकरभाऊ काटे यांच्या गटातील शिंदाड गावासाठीचे उभारण्यात आलेल्या भव्य अश्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रंजनाताई पाटील, पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.श्री.लालचंद पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मा.श्री. अमोल शिंदे, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती मा.श्री. सुभाष (मुंडे) पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मा.श्री. समाधान वाघ, गटविकास अधिकारी मा.श्री. आतुल पाटील याची उपस्थिती होती.
यावेळी सरपंच मा.श्री. ज्ञानेश्वर तांबे व उपसरपंच मा.श्री. नरेंद्र पाटील, चेअरमन मा.श्री. समाधान पाटील, पिंपळगाव व शिंदाड गटातील सर्व सरपंच अनेक मान्यवर आशा सेविका, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते.