कापूस व्यापारी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी दलाला पासून सावध रहावे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१०/२०२१
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच पांढर सोन म्हणून ओळखले जाणारे कापूस हे पिक अतिवृष्टी मुळे होत्याच नव्हतं झाल. आता जेमतेम कापूस हाती येत आहे. त्यातही पन्नास टक्केच कापूस हाती येणार असून आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कापून विकणे गरजेचे आहे.
याच संधीचा फायदा घेत कापूस व्यापाऱ्यांनी संघटीत होऊन चांगला कापूस कमी भावनेने खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. तसेच आता गावागावात कापूस व्यापारी तयार झाले आहेत ही चांगली बाब असली तरी यापैकी काही व्यापारी मनमानी करत शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावात विकत घेण्यासाठी प्रयत्न करतात.
या कारणांमुळे काही शेतकऱ्यांनी बाहेर गावच्या व्यापाऱ्यांना बोलावून कापूस विकण्याचा प्रयत्न केल्यास स्थानिक व्यापारी बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांवर दडपण आणत असल्याने नहाकच भांडणे नकोत म्हणून हे व्यापारी कापूस खरेदीसाठी येत नाहीत.
या समस्येवर तोडगा काढून काही मोठ्या व्यापाऱ्यांनी गावागावातील काही व्यक्तींना एक प्रकारे (दलाल) बनवून गावागावात कापूस खरेदी सुरु केली आहे. या गाजऱ्या गवतासारखे उगवलेले दलाल बाहेर गावच्या कापूस व्यापाऱ्यांना व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेटून सौदेबाजी करत प्रति क्विंटल २५०/०० ते ३००/०० रुपयाच्या फरकाने कापूस खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.
तरी सुज्ञ शेतकरी व व्यापाऱ्यांनी सांगितलेल्या व दिलेल्या माहितीनुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कुणाच्याही दबावाखाली न येता थेट व्यापाऱ्यांशी व व्यापाऱ्यांनी थेट कापूस उत्पादक शेतकऱ्यांशी संधान साधून समन्वय साधत कापसाची विक्री व खरेदी केल्याने शेतकऱ्यांना पुरेपूर भाव मिळेल असे सांगितले आहे.
तसेच ज्या गावातील व्यापारी बाहेर गावच्या व्यापाऱ्यांना त्यांच्या गावात येण्यासाठी अडचणी आणत असतील अश्या व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी सत्यजीत न्यूजशी संपर्क साधावा नक्कीच कापसाला योग्य भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांना मदत व सहकार्य करण्यात येईल.