सुमीत किशोर आप्पा पाटील आऊ मुकुंदअण्णा बिल्दीकर आयोजित,दांडिया रास गरबा ग्रुप नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०९/२०२२
दांडिया रास गरबा ग्रुप नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस सुमीत किशोर आप्पा पाटील आऊ मुकुंदअण्णा बिल्दीकर आयोजित जल्लोश २०२२ जागर शक्तीचा उत्सव भक्तीचा तर्फे पाचोरा शहरात मानसिंग ग्राऊंडवर दांडीया रास व गरबा स्पर्धेस प्रचंड एतिहासीक प्रेक्षक & स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे वैयक्तीक प्रवेश नोंदणी बंद करण्यात असली तरी आज दिनांक २९ सप्टेंबर २०२२ शुक्रवार रोजी कार्यक्रम स्थळी फक्त ग्रुपची नोंदणी सुरु राहणार आहे.
सदरच्या दांडीया गरबा ग्रुप स्पर्धा दिनांक ०१ आणि ०२ ऑक्टो. रोजी संपन्न होणार आहे यासाठी प्रथम क्रमांक- ७०००/- व्दीतीय क्रमांक -५०००/ तृतीय क्रमांक- २१००/- असे बक्षीस देण्यात येणार आहे. तरी संबंधित ग्रुपने आपली स्वतःची थिम स्पष्ट करून, गाण्याचा कालावधी १० मिनीटे आवश्यक असुन गाण्याचा पी. डी. स्वतःचा आणावा असे आवाहन संकल्पना प्रमुख ग्रीन अँपल इव्हेन्टस, पाचोरा यांनी केले आहे.