पाचोरा, नगरदेवळा, जामनेर, शेंदुर्णी व नांद्रा परिसरातील गुटका किंगवर आशिर्वाद कुणाचे ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०३/२०२३

सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात गुटख्याचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याने विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. एकनाथराव खडसे साहेबांनी या गुटख्याच्या अवैध व्यवसायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अन्न व औषध प्रशासन, पोलीस व यांना पाठीशी घालाणारांचा खरपूस समाचार घेतला होता. तसेच अन्न व औषध प्रशासनाने मुक्ताईनगर परिसरात लाखोंचा नव्हे तर करोडो रुपयांचा गुटखा पकडला असला तरी पाचोरा, नगरदेवळा, जामनेर, शेंदुर्णी व नांद्रा परिसरात आजही राजरोसपणे किरकोळ व होलसेल गुटखा विक्री सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पाचोरा शहरात एका गुटखा विक्रेत्याच्या नावाची सन(सनी)त चर्चा ऐकायला मिळते अशा सन(सनी)त गुटखा विक्रेत्यावर अद्यापही कारवाई केली जात नसल्याने पाचोरा शहरातून कधी चोरट्या मार्गाने तर कधी दिवसाढवळ्या गुटखा विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे पाचोरा शहरातील गुटखा हा संपूर्ण तालुक्यातील पानटपरी, किराणा दुकान, लहानमोठे हॉटेल व चहाच्या दुकानात घरपोच मिळत असल्याकारणाने शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांजवळ गुटखा विक्री होत असल्याने शाळा, कॉलेजचे अल्पवयीन विद्यार्थी या गुटख्याच्या आहारी जात आहेत.

तर दुसरीकडे मंदिर परिसरात तसेच सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन पिचकारी मारणारांची संख्या जास्त असल्याने सगळीकडे घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. म्हणून आतातरी पाचोरा, नगरदेवळा, जामनेर, नांद्रा येथील गुटखा किंगवर कारवाई करण्यात येईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून वरील गावांना संपूर्ण गुटखाबंदी व्हावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

(पिंपळगाव हरेश्वर, लोहारा, वरखेडी येथील गुटखा विक्रीबाबत सविस्तर वृत्त पुढील भागात.)