माणुसकी समूहातर्फे पोलीस स्टेशनच्या टीमला कोरोणा योद्धा सन्मान
माणुसकी समूहातर्फे पहुर पोलीस स्टेशनच्या टीमला कोरोना योद्धा सन्मान…
सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम
दिलीप जैन. ( पाचोरा )
पहूर ता जामनेर येथील पोलीस स्टेशनचे एपीआय राकेश सिंग परदेशी यांच्या टीमने कोरणा या महाभयंकर आजाराने थैमान घालत असताना रात्रंदिवस गस्तीवर राहून गोरगरीब लोकांची सेवा केली , लोकांमध्ये प्रत्येक गावात जाऊन नागरिकांमध्ये बद्दल माहिती देण्यात आली. स्वतःच्या जीवाची काळजी न करता आणि सेवा केल्याबद्दल माणुसकी रुग्णसेवा समूह यांच्यावतीने कोरोना योद्धा सन्मान संपूर्ण पोलिस स्टेशन टीमला देण्यात आला. यावेळी एपीआय राकेश सिंग परदेशी यांनी माणुसकी समूहाचे समाजकार्य जाणून घेतले व कार्याचे कौतुक केले . यावेळी माणुसकी ग्रूप जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर, डॉक्टर काशिनाथ माळी ग्रुप सदस्य हजर होते ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर जितेंद्र वानखेडे सर यांनी केले व आभार डॉक्टर संदीप कुमावत यांनी मानले.