सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • शेंदुर्णी येथील संशयास्पद व्यवहारावरुन दि पाचोरा पीपल्स बॅंक निवडणुकीत सहकार पॅनल अडचणीत.

  • कुऱ्हाड खुर्द येथील हॉटेल तारांगणाचा धिंगाणा थांबला, परंतु हॉटेल मैत्रीचे काय ?

  • पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.

  • वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणीने भावाला दिली गाय भेट.

  • लोहारी बुद्रुक सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात महिला उपसरपंचांची तक्रार, चौकशी करुन कारवाईची केली मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›शेंदुर्णी नगरपंचायत तर्फे इंडियन स्वच्छता लीग ला सुरुवात.

शेंदुर्णी नगरपंचायत तर्फे इंडियन स्वच्छता लीग ला सुरुवात.

By Satyajeet News
September 18, 2022
141
0
Share:
Post Views: 92
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०९/२०२२

केंद्र शासनातर्फे १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ दरम्यान स्वच्छ अमृतमहोत्सव उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमांतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत नगरपंचायतची शेंदूर्णी टायफून्स ही टीम सहभागी झाली असून स्वच्छ व सुंदर शहरासाठी शनिवारी दिनांक १७ सप्टेंबर शनिवार पासून नगरपंचायत कार्यालयापासून स्पर्धेला सुरवात करण्यात आली. यावेळी स्वछतेची शपथ घेण्यात आली. त्यानंतर श्री. क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. त्रिविक्रम महाराज मंदिरच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. सदर उपक्रमवेळी शेंदुर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगराध्यक्ष श्री. निलेश थोरात, व सर्व सन्माननिय नगरसेवक, नगरसेविका, समाजसेवक गोविंदजी अग्रवाल, पक्षाधिकारी, पत्रकार बंधु व इतर नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमवेळी नगराध्यक्षा सौ. विजयाताई खलसे म्हणाल्या की निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात केल्यास शेंदुर्णी शहरासह परिसर नक्कीच स्वच्छ होण्यास उशीर लागणार नाही. म्हणून शहराची स्वच्छता करुन घेत ती कायमस्वरूपी टिकवण्यासाठी या स्वच्छता अभियान मध्ये प्रत्येक तरुणांचा सहभाग वाढावा, या अनुषंगाने शेंदुर्णी नगरपंचायतने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात केंद्र सरकारच्या स्वच्छ अमृत महोत्सवातदेखील नगरपंचायत सहभागी झाली असून येत्या पंधरवाड्यात नगरपंचायत मार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. याकरिता आपण सगळ्यांनी सहभागी होऊन आपल्या शेंदुर्णी नगरीचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात झाले पाहिजे तसेच गाव करील ते राव को करील म्हणून सगळ्यांनी हातभार लावत सहभागी व्हावे असे आवाहन केले.

हा कार्यक्रम १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत केंद्रीय गृह आणि शहरी विकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत संपूर्ण भारतात आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना एकत्र जोडून स्वच्छतेसंदर्भातील कामात त्यांचे सहकार्य घेणे आणि कचरामुक्त शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे. तरी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे इंडियन स्वच्छता लीग मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले.

उपनगराध्यक्ष श्री. निलेश थोरात यांनी शेंदूर्णीच्या नागरिकांनी केंद्र शासनाच्या माय गव्हरमेंट पोर्टल वर जावून इंडियन स्वच्छता लीग मध्ये नोंदणी केल्यानंतर आपल्या नगरपंचायतच्या शेंदूर्णी टायफून्स ह्या टीम मध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याच्या सूचना ह्यावेळेस त्यांनी दिल्या. यावेळी जमलेल्या नागरिकांनी या मोहिमेत भाग नोंदवत अभियानास प्रारंभ केला.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंबे वडगाव गावातील वाढते अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच ...

Next Article

रेल्वेच्या तिसऱ्या मार्गामुळे अडचणीत येणारा तारखेडा-गाळण रस्त्याचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पुलवामा येथे शहीद झालेल्या शूरवीर जवानांना विनम्र श्रध्दांजली.

    February 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथे २२ मार्च ते २४ मार्च पर्यंत जनता कर्फू.

    March 21, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डुकरे उदंड झाली, लक्ष्मी निघून चालली. गावठी डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास दिनांक १५ ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण.

    July 31, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथे डॉक्टर भूषण दादा मगर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान.

    June 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सावखेडा येथील पिडीत कुंटूबीयांची जिल्हापरिषद सदस्य मधुकर काटे. यांनी घेतली भेट.

    December 10, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कायमस्वरूपी दारूबंदी करण्यासाठी कुऱ्हाड येथील महिला आक्रमक.

    December 10, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज एकदिवसीय धरणे आंदोलन.

  • पाचोरा तालुका.

    कोल्हे गावाजवळील फरशी पुलावर पडला मोठा खड्डा, अपघाताची शक्यता असल्याने नवीन पुलाची मागणी.

  • ब्रेकिंग न्यूज

    माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज