पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल पवार यांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गौरव.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०४/२०२४
पिंपळगाव पोलीस स्टेशनला दोन वर्षांपूर्वी कार्यरत असलेले शिस्तप्रिय पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार यांनी पॉस्को गुन्ह्याची यशस्वी उकल केल्याबद्दल त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. मा. श्री. अमोल पवार यांची विशेष कामगिरी म्हणजे तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेबांच्या कार्यकाळात मागील ऑक्टोबर महिन्यात सार्वे पिंप्री येथील मुकबधीर तरुणी बाबत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. तरुणी मुकबधीर असल्याकारणाने गुन्ह्याचा तपास करणे अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा होते परंतु उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार यांनी मुकेश लोकरे, योगीता चौधरी, पंकज सोनवणे, अभिजित निकम व अमोल पाटील या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर आरोपीची डी. एन. ए. चाचणी करुन गुन्ह्याची यशस्वी उकल केली होती. हा गुन्ह्याचा तपास कमी वेळात सिध्द करुन आरोपीला तात्काळ अटक केली होती. या चांगल्या कामाची दखल घेऊन जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी यांनी दिनांक १९ एप्रिल शुक्रवार रोजी उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार व तपासकार्यात सहभागी असलेल्या सहकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार केला.
उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार हे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे करणारांना वठणीवर आणले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मा. श्री. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी त्यांना सन्मानित केल्याबद्दल पिंपळगाव हरेश्वर परिसरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.