जेष्ठ पत्रकार किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार घोषित खा. शरदचंद्रजी पवार यांच्याहस्ते पुण्यात वितरण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०३/२०२४
समाजसेवेचा वसा हाती घेऊन लोकाभिमुख पत्रकारिता करणारे पाचोरा शहरातील पत्रकार मा. श्री. किशोर रायसाकडा यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार जाहीर झाला असून दिनांक १६ मार्च २०२४ शनिवार रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड (पुणे) येथे खा. मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सदर पुरस्कार मा. श्री. किशोर रायसाकडा यांना देऊन सन्मानित करण्यात येणार या अगोदरही मा. श्री. किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक या पुरस्काराने पुणे येथे गौरविण्यात आले होते.
या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, दिल्ली , गुजरात येथील जेष्ठ व गुणवंत पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचा युद्ध वार्ता, आरोग्य पत्रकारिता, कृषी पत्रकारिता, शोध पत्रकारिता, अभिव्यक्ती पत्रकारिता अशा विविध पुरस्कारांचे वितरण खा. मा. श्री. शरदचंद्रजी पवार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे
मा. श्री. किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.