सासरच्या जाचाला कंटाळून कुऱ्हाड तांडा येथील विवाहितेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या, पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०७/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी असलेल्या व सद्यस्थितीत पाचोरा शहरातील गोविंद नगर भागात राहणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहित महिलेने घराजवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दिनांक १३ जुलै २०२३ गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आली असून या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला आकस्मात मृतूची नोंद करण्यात आली असली तरी आमच्या मुलीने केलेला प्रेमविवाह सासरच्या मंडळीला मान्य नसल्याचे सांगत सासरच्या मंडळींकडून आमच्या मुलीला घरातील लोकांकडून चांगली वागणूक न देता तीचा सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता म्हणून आमच्या मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोप करत माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळी विरोधात पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असल्याचे खात्रीलायक आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवाशी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह जामनेर तालुक्यातील लिहे तांडा येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर नव्या नवरीचे नऊ दिवस याप्रमाणे वागणूक मिळाली परंतु काही दिवसांनी आजल सासू, सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु यांच्याकडून काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हीस तीची चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचुन बोलत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. सतत होणाऱ्या भांडणा मुळे राहुल चव्हाण हा १० जुलै २०२३ सोमवार रोजी काजल सोबत पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता. दरम्यान १३ जुलै २०२३ गुरुवार रोजी पहाटेच्या सुमारास काजल हिने टोकाचे पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली.
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजल हीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हीस मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात काजल हिच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश करत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजल हिने आत्महत्या केल्याचे बोलुन दाखविले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.