एकाव ते नवलच जातांना दोघ आणि येतांना तिघ, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आरोपी अटकेत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०५/२०२३
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खेडेगावातील एकाच समाजातील एक तरुण व एक अल्पवयीन तरुणी हे प्रेमी युगुल मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या राहत्या गावातून पळून गेले होते. हे प्रेमीयुगुल पळून गेल्याचे लक्षात येताच मुलीच्या कुटुंबीयांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२३ आय. पी. सी. ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या पळुन गेलेल्या पासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे व त्यांचे सहकारी या प्रेमी युगालांच्या शोधत मोहीम राबवत होते.
ही शोध मोहीम राबवत असतांनाच गुप्त खबऱ्या मार्फत माहितीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी संबंधित प्रेमियुगलास सोलापूर येथून ताब्यात घेतले. यावेळी पळून गेलेल्या दोन्ही प्रेमी युगलांसोबत एक चार दिवसाचे गोंडस बाळ दिसून आल्याने पोलीसही आवाज झाले. संबंधित गुन्ह्यातील अल्पवयीन पिडीत मुलगी, तिला पळवून नेणारा आरोपी व त्या लहानशा बाळाला घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला हजर केले असता संबंधित पीडितेने जन्म दिलेल्या बाळा बद्दल विचारले असता संबंधित आरोपीने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर पळवून नेल्याचे सांगत ते बाळ आरोपीचे असल्याचे सांगितले आहे.
पीडितेच्या सांगण्यावरून संबंधित आरोपींविरोधात भा. द. वी. कलम ३७६ पोस्को कायदा वाढीव कलम ३. ४ नुसार गुन्हा नोंद करण्यात येऊन आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून संबंधित पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याकारणाने तीला आशादीप सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार व त्यांचे सहकारी करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील एका तरुणाचे त्याच्याच समाजातील एका अल्पवयीन मुलीशी संबध जुळले होते. या संबधात त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्यामुळे जे व्हायला नको तेच घडल याची कुणकुण दोघांच्या घरच्यांना लागली होती. म्हणून याच्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु असतांनाच हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत व आपली ताटातूट होईल म्हणून दोघांनी पळुन जाण्याचा निर्णय घेतला. व योग्य संधी साधून दोघांनी गावातून पलायन केले.
हे दोघेही पळून गेल्यानंतर मुलीच्या वडिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यावर पोलीसांना त्यांच्या कार्यकुशलतेने दोघांनाही शोधून काढले. मात्र तेव्हा संबंधित अल्पवयीन मुलीने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची बाब पुढे आली. संबंधित तरुण व मुलींला आणल्यानंतर कायद्यानुसार कारवाई झाली असली तरी (जातांना दोघ आणि येतांना तिघ) असा प्रसंग बघावयास मिळाला.
(आजच्या परिस्थितीत अशी प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत असून कुटुबप्रमुखांनी आपल्या मुलांकडे जातीने लक्ष ठेवले पाहिजे म्हणजे अश्या घटना घडणार हे मात्र निश्चित.)