पाचोरा तालुक्यातील अवैध धंदे व भ्रष्टाचार करणारांची हिंमत वाढल्याने, तक्रारदारा विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याची शृंखला सुरुच.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०९/२०२२
जळगाव जिल्ह्यात तसेच पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात सट्टा, पत्ता, जुगार, झन्ना, मन्ना या अवैध धंद्यासह गावठी दारू निर्मिती व विक्री तसेच देशी व इंग्लिश दारुची दुकानातून, पान टपरीतून तसेच उपहारगृह व लहान मोठ्या हॉटेल्समधून व काही ठिकाणी भरवस्तीत खुलेआम विक्री सुरु झाली आहे. या अवैध धंद्यामुळे गावागावांतील गल्लीबोळातून लहान मुलांसह सर्वच वयोगटातील लोक व्यसनाच्या आहारी जात असल्याने गावागावांतील घराघरात, गल्लीबोळात अशांतता पसरली आहे.
यामुळे घराघरांतून दररोज भांडणतंटे तसेच गल्लीबोळात दारुड्यांचा धुमाकूळ, दारुच्या नशेत भररस्त्यावर लघुशंका करणे, खुलेआम अश्लील शिवीगाळ करून रस्त्यावरील लोकांना पैशाची मागणी करणे पैसे न दिल्यास शिवीगाळ करत हमरीतुमरीवर येणे, व्यसन पूर्तीसाठी घरातील धनधान्य विकणे, घरातील महिलांना मारठोक करणे, रस्त्यावर चालणाऱ्या महिला, मुलींची छेडखानी करणे असे प्रकार घडत आहेत.
अश्या प्रकारे नंगानाच सुरु असल्यावर ही दारुबंदी खाते व पोलीस प्रशासन यांचे या अवैध धंद्याकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते आहे. तर काही ठिकाणी या अवैध धंदे करणारांची काही राजकारणी, स्वताला प्रतिष्ठित समजून घेणारे काही लोक व हप्ते खोरीने पछाडलेले काही अधिकारी व कर्मचारी हे या अवैध धंदे करणारांची पाठराखण करत असल्याचे जनमानसातून व सुज्ञ नागरिकांतून ऐकायला येत आहे व तसे अनुभव सर्वसामान्य लोकांना येत आहेत.
हि परिस्थिती पाहून गावागावांतील काही सुज्ञ नागरिक व आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो अशी भावना उराशी बाळगून आपला समाज चांगला रहावा यासाठी या अवैध धंद्याच्या विरोधात अर्जफाटे व तक्रारी करत आहेत. परंतु या तक्रारींची पाहिजे तेवढी दखल घेतली जात नसल्याने गावपातळीवरील अवैध धंदे दिवसेंदिवस वाढतच आहेत. म्हणून की काय या अवैध धंदे करणारांची हिंमत वाढली असून ज्या, ज्या गावातून अवैध धंदे, शासन मान्य स्वस्त धान्य दुकान यांच्या विरोधात तसेच गावागावांतील आलेली विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत व इतर सामाजिक विघातक बाबतीत जनहितार्थ काम करणारे समाजसुधारक, समाजसेवक, तंटामुक्ती अध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते विशेष करुन महिला मंडळे हे तक्रारी करुनही यांच्या तक्रारीवरून कारवाई होणे तर दूरच मात्र ज्यांच्या विरोधात तक्रारी केल्या जातात त्यांना मोकाट सोडून काही भ्रष्ठाचारी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी हे लबाडांना वकिली सल्ला देऊन शासकीय कार्यालये असतील तर ३५३, पैसे चोरण्याचा प्रयत्न केला किंवा स्वता कागदपत्रे फाडून खोटा बनाव करुन संबंधित तक्रारीची कोंडी करतात तर अवैध धंद्याच्या विरोधात बोलणाराच्या विरोध एखाद्या महिलेला उभे करुन विनयभंग, गळ्यातील सोन्याची पोत किंवा इतर दागिने हिसकावून घेतले असल्याबाबत तसेच पैशाची मागणी केल्याची किंवा जातीयवाचक शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार करुन अशा जनहितासाठी झटणारांना कोंडीत पकडण्यासाठी खटाटोप करत असल्याने जळगाव जिल्ह्यास पाचोरा तालुक्यातील गावागावातून अवैध धंदे, विकास कामात भ्रष्ठाचार, स्वस्त धान्य दुकानातून भ्रष्टाचार करणे हे प्रकार वाढत असल्याने जनमानसातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हा प्रकार येथेच थांबला नाही तर भविष्यात सर्वसामान्य जनता न्याय मिळवून घेण्यासाठी नक्कीच रस्तावर येईल यात तिळमात्र शंका नाही असे काही जाणकार सांगतात.
(अवैध धंदे, भ्रष्टाचार, अत्याचार यांबाबत पत्रकारितेच्या माध्यमातून रोखठोकपणे सतत लिखाण करत असल्याने मलाही हस्ते, परहस्ते थांबण्यासाठी काही समाजकंटक प्रयत्नशील आहेत.)