कोरोना फक्त आठवडे बाजारातूनच पसरतो का ? भाजीपाला पिकवणारे शेतकरी व व्यवसाईकांचा सवाल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०३/२०२१
सगळीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने
सोशल डिस्टेंसिंग (सामाजिक अंतर) राखण्यासाठी नागरीकांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून विवाहसोहळा, सामाजिक, धार्मीक कार्यक्रम, सभा, मोर्चा तसेच जीवनावश्यक असणारा म्हणजे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढून प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत.
मात्र एकिकडे कायदा पाळणारांचे हाल होत असून मनमानी करणारांचे सगळेच काही अलबेला सुरु असून यात महत्त्वाचे म्हणजे राजकीय लोकांच्या बैठका, आंदोलने, शक्तीप्रदर्शन, बसस्थानकावर व बसमध्ये गर्दी तसेच श्रीमंतांचे विवाहसोहळे मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवत राजरोसपणे सुरु आहेत.
तसेच शहरातील मोठमोठ्या भाजीपाल्याची चाळ (सब्जीमंडी) कायमस्वरूपी सुरु असून संपूर्ण तालुक्यातील जनता शहरात जाऊन आपल्यासाठी लागणारा भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदी करून आणतात परंतु गोरगरीब, हातमजुरांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बाजार करणे शक्य होत नसल्याने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिठ, मिरच्या खाऊन दिवस काढावे लागत आहेत.
विशेष म्हणजे शहरात भाजीपाला व रस्त्यावर बसून विविध वस्तू विकणारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून जर या दुकानांची व खेडेगावात भरणाऱ्या आठवडे बाजारातील दुकानांची तुलना केल्यास शहरातील दुकानापेक्षा खेडेगावातील दुकानांची संख्या खुपच कमी येईल.
म्हणजे शहरात अलबेला सुरु ठेवून फक्त आणि फक्त गावागावात भरणारे आठवडे बाजार बंद कश्यासाठी ? तसेच फक्त आणि फक्त खेडेगावातील आठवडे बाजारातूनच कोरोनाचा प्रसार होतो का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला आहे.
कोरोनाचा नायनाट लवकरात लवकर व्हावा म्हणून शासनाच्या आदेशाचे पालन करून आम्ही सुध्दा शासन, प्रशासनाला मदत करत आहोतच परंतु दुसरीकडे मात्र कायदा खिशात घेऊन फिरणारांची चांदी आहे. असे का ? असाही प्रश्न विचारला जात आहे.
[महत्त्वाचे=आठवडे बाजार बंद झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक व विक्रेता अडचणीत सापडला असून भाजीपाला मातीमोल भावात विकावा लागत असून पालेभाज्या गुराढोरापुढे फेकाव्या लागत आहे तसेच इतर व्यवसायीकावर उपासमारीची वेळ आली आहे.]
(नियम लावायचेच असतील तर ते सगळ्यांसाठी सारखे आमलात आणून कारवाई व्हावी व आपला तो बाळ्या दुसऱ्याच ते कार्ट अशी वागणूक देऊन जनतेच्या भावनांशी खेळु नये)