शिक्षकांच्या कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटलांची झलक सबसे अलग.

राजेंद्र खैरनार.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२३

काही लोक कितीही मोठे झाले व कितीही मोठ्या पदावर कार्यरत असला तरी ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे वावरतात असेच सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील हे कुठेही, कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहून जनमानसात मिसळून जातात.

असाच एक प्रसंग काल बघायला मिळाला काल “द रायझिंग सिंगिंग स्टार” या शिक्षकांच्या ग्रुपचा प्रथम वर्धापनदिनानिमित्त शिवतीर्थ मैदानावर संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मा. श्री. संजयजी वाघ, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सचिन दादा सोमवंशी, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील. जिल्हापरिषदचे शाखा अभियंता मा. श्री. चंद्रकांत वाडीले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या संगीत रजनीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमात आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी “दिल आज शायर है, गम आज नग़मा है शब ये ग़ज़ल है सनम दिल आज शायर है. हे किशोर कुमार यांनी गायलेले गित आपल्या सुमधुर आवाजात सादर केले. आमदारांनी गीत गायनाला सुरवत करताच सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले. तसेच जिल्हापरिषदचे शाखा अभियंता मा. श्री. चंद्रकांत वाढविले यांनी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला.

यावेळी द रायझिंग सिंगिंग स्टार गृपचे अध्यक्ष राजेंद्र कोळी, सचिव अजय अहिरे, उपाध्यक्ष राजेंद्र राठोड, सदस्य आदित्य सोनवणे, वृषाली सोनार, प्राजक्ता जळतकर, रहीम तडवी, अतुल चित्ते, राकेश सपकाळे, स्वाती महाजन, सुवर्णा पाटील, रवींद्र पाटील, दिलीप सोनवणे, प्रकाश बडगुजर, प्रतिभा बडगुजर, खुशी दायमा, सिध्दी कुलकर्णी व धनश्री कुलकर्णी या कलाकारांनी रसिकांच मने जिंकली. त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. सूत्रसंचालन प्रकाश लोंढे यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या