दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०२/२०२३

भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष मा. श्री. नंदूभाऊ साखला व राज्य सचिव मा. श्री. दीपक भाऊ चोपडा हे खान्देश दौऱ्यानिमित्त जळगाव येथे आलेले होते. यानिमित्ताने जळगाव येथील स्वाध्याय भवनात जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चोपडा येथील मा. श्री. लतीश भवरलाल जैन यांनी मागील बऱ्याच वर्षांपासून समाजासाठी विविध उपक्रमाअंतर्गत केलेली कामे व योगदान लक्षात घेऊन त्यांची “जळगाव, धुळे, नंदुरबार” या तीन जिल्ह्यांच्या विभागीय उपाध्यक्षपदी सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी जळगावचे विनयजी पारख, राज्य कार्यकारणी सद्स्य चंद्रकांत डागा, मुक्ताईनगरचे जेष्ठ कार्यकर्ते रमनलालजी बागरेचा, अमळनेरचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद जैन, कांतीलाल जैन चोपडा अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव गौरव कोचर, कोषाध्यक्ष अभय ब्रम्हेचा, दर्शन देशलहरा, यांच्या उपस्थितीत लतीश जैन यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला या निवडीबद्दल जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील जैन समाजबांधवांना कडून लतीश जैन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.