सुटीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला; परिसरात खळबळ.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०५/२०२१
पाचोरा तालुक्यातील येथील रहिवासी व आर्मी ट्रेनिंग कॅम्प नाशिक येथून सध्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. ही घटना शनिवारी सकाळी आखतवाडे शिवारात उघडकीस आली.
प्रमोद दिनकर पाटील (२६) असे या मृत जवानाचे नाव असून देवळाली (नाशिक ) येथील आर्मी ट्रेनिंग कॕम्पमध्ये पी.टी.मास्तर म्हणून ते नुकतेच रुजू झाले होते. २६ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता.
याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती हाती आली नसून पाचोरा, भडगाव तालुक्यात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.