शिंदाड येथे प्रांताधिकारी सह वैदयकीय पथक दाखल,८४व्यावसायिकांची केली रॅपिड टेस्ट.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०४/२०२१
शिंदाड ता पाचोरा -परिसरात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता भीतीचे वातावरण पसरले असून २ तरुणांसह ५ जणांचे मृत्यून सर्वत्र घबराट झाली आहे ह्याच पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सह वरिष्टनी गावात भेट देऊन परिस्तितीची पाहणी केली
शिंदाड परिसरात काही दिवसांपासून कोरोनाचे साथीने नागरिक आजारी आहेत अनेक जण भीतीने आपली तपासणी न करता घरगुती उपच्यार करीत आहे गेली १५ दिवसात २तरुणांसह ५ जणांचा मृत्यूने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे ह्याच पार्श्वभूमीवर पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार कैलास चावडे, तालुका वैदयकीय अधिकारी समाधान वाघ ,गटविकास अधिकारी अतुल पाटील , तसेच पिंपळगाव शिंदाड जि प सदस्य मधुकर पाटील यांनी गावात फेरफटका मारून परिस्तितीची पाहणी केली तसेच कोरोनाने मृत्यू पावलेले विनायक पाटील,जीवेंद्र सपकाळे यांचे घरी अधिकाऱ्यांनी भेट दिली ,तसेच तातडीने संशयित रुग्णाचे घरी जाऊन आर्टिपीसीआर टेस्ट करण्यात आली तसेच गावातील व्यावसायिक यांची देखील रॅपिड टेस्ट करण्यात आली ८४ नागरिकांचे रॅपिड टेस्ट मध्ये सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्यामुळे काही अंशी भीती कमी झाली ,तर ४७ संशयित नागरिकांची आर्टिपीसीआर टेस्ट करण्यात आली या वेळी प्रांताधिकारी यांनी नागरिकांना सूचना देऊन वैदयकीय पथकाला सहकार्य करण्याचे सूचना केल्या आहेत ग्राम पंचायत ने गावात २वेळा फवारणी केली असून ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी परिस्तितीवर लक्ष ठेऊन आहे यावेळी सरपंच ज्ञानेश्वर तांबे,उपसरपंच नरेंद्र पाटील ग्राम पंचायत सदस्य संदीप सराफ,स्वप्नील पाटील,विस्तार अधिकारी आर एस धस,मंडळ अधिकारी अनिल पाटील,तलाठी गणेश मगावकर,ग्राम विकास अधिकारी एन एम मराठे,उपस्तीत होते, डॉ मयूर पाटील,डॉ शेखर पाटील,गोकुळ शिरसाठ, अशोक धुरंधर,रमेश चौधरी व वैद्यकीय कर्मचारी ,आशा वर्कर यांचे पथक गावात योग्य ती तपासणी करत आहे